Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशात धर्मांतराशी संबंधित कायदा लागू असूनही अशी प्रकरणे दररोज उघडकीस येत आहेत. कानपूरमध्ये धर्मांतराचे आणखी एक प्रकरण समोर आले असून, त्यात एका अल्पवयीन हिंदू मुलाला पैशाचे आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस दलाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह कानपूरच्या बेनाझाबारमध्ये असलेल्या इमॅन्युएल पेंटेकोस्टल चर्चवर छापा टाकला.
दरम्यान, हिंदू (Hindu) धर्माच्या लोकांना पैशाचे आमिष दाखवून येथे बोलावले जाते, असा आरोप बजरंग दलाचे कार्यकर्ते कृष्णा यांनी केला. त्यानंतर त्यांच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जातो.
एका अल्पवयीन मुलाने 50 हजार रुपयांचे आमिष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केला जात असल्याचा आरोपही केला आहे.
आपल्याला नोकरीचे आमिषही दिले जात असल्याचे अल्पवयीन मुलाने सांगितले. पोलिसांच्या छाप्यादरम्यान चर्चच्या केअरटेकरसोबत बाचाबाची झाली, त्यानंतर पोलिसांनी (Police) चर्चमधील लोकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलानेही पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. मात्र, चर्चच्या लोकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. एसीपी संजय सिंह यांनी सांगितले की, प्रत्येक पैलूची चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
तसेच यापूर्वीही शहरात अनेक ठिकाणी असे प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व प्रकरणाचा एका संघटनेशी संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.