पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य; जंतर-मंतरवर AIMIM चे प्रदर्शन, हिंदू महासभेच्या समर्थनार्थ मोर्चा

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत नुपूर शर्माच्या बाजूने आणि विरोधात वेगवेगळे भाषणबाजी आणि निदर्शने सुरू आहेत.
Demonstrations of AIMIM on Jantar Mantar
Demonstrations of AIMIM on Jantar MantarDainik Gomantak
Published on
Updated on

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत नुपूर शर्मा यांच्या बाजूने आणि विरोधात वेगवेगळी भाषणबाजी आणि निदर्शने सुरू आहेत. आज असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM दिल्लीतील जंतरमंतरवर नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत, तर हिंदू महासभा नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ लखनऊमध्ये पायी मोर्चा काढणार असल्याचे सांगितले जात आहे. (Controversial statement on Prophet Muhammad Demonstrations of AIMIM on Jantar Mantar)

Demonstrations of AIMIM on Jantar Mantar
भारत लवकरच गहू निर्यात करणार ?

आदल्या दिवशी एआयएमआयएसचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत नुपूर शर्मा यांना अटक करावी असे म्हटले होते. नुपूर शर्माने माफी मागितली नसून आपल्या वक्तव्यात इंग्रजीत 'इफ' लिहिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नुपूर शर्माने माफी कुठे मागितली? पुढे असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हे सरकार बुलडोझरचे राजकारण आहे, काही झाले की बुलडोझर चालवतात, त्यामुळे आता नुपूर शर्माच्या घरावर बुलडोझर चालणार का? ते म्हणाले की जेव्हा देशातील मुस्लिमांचा प्रश्न येतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांचे ऐकत नाहीत. पंतप्रधानांना भारतीय मुस्लिमांचे दुःख समजत नाही. भाजपने देशातील मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला बक्षीस: भीम आर्मी चीफ

भीम आर्मीचे प्रमुख सतपाल तन्वर यांनी नुपूर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करताना नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे. नुपूर शर्माने पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल माफी मागितली आहे, यासोबतच पक्षाने त्यांच्यावर कारवाईही केली आहे, तरीही राजकारण रंगवण्यात गुंतलेल्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही. पोलिसांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. सतपाल तवंत यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Demonstrations of AIMIM on Jantar Mantar
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई 'मास्टरमाईंड'

याआधीही अनेकांनी चित्रपट आणि राजकीय व्यक्तींना धमक्या देऊन वाद निर्माण केला असून तवंत यांच्या या वक्तव्यावर मात्र जोरदार चर्चा रंगत आहे. भीम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी आरोप केला आहे की नुपूर शर्मा यांनी पैगंबराचा अपमान केला आणि त्यामुळे करोडो मुस्लिम समाज दुखावला गेला आहे.

अलिगड मुस्लिम विद्यापीठात निदर्शने

आदल्या दिवशी अलीगढ मुस्लीम विद्यापीठात नुपूर शर्मा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन देखील करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी एएमयूमध्ये नूपूरच्या विरोधात निषेध मोर्चा काढला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांनी नुपूर शर्माच्या अटकेची मागणी सुद्धा केली आहे.

हे संपूर्ण प्रकरण आहे

विशेष म्हणजे, पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपने रविवारी पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्राथमिक सदस्यत्वावरून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. नुपूर शर्मा 27 मे रोजी एका खासगी वाहिनीच्या चर्चेत सहभागी झाल्यापासून हे संपूर्ण प्रकरण सुरू झाले आहे. यादरम्यान ज्ञानवापी मशिदीच्या वादावरती चर्चा होत होती. यादरम्यान नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर काही कथित टिप्पणी केली होती. यानंतर नुपूर शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शर्मावर पैगंबराचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर देशभरात भाजपविरोधात जोरदार निदर्शने झाली आणि नुपूर शर्माच्या अटकेची मागणीही यावेळी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com