Congress Tax Row: काँग्रेसचे 65 कोटी रुपये जप्त; आयकर विभागाची मोठी कारवाई

Congress Tax Row: आयकर विभागाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खात्यातून एकूण 115 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी 65 कोटी रुपये रिकव्हर केले आहेत.
Sonia Gandhi & Rahul Gandhi
Sonia Gandhi & Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Congress Tax Row: आयकर विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. विभागाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खात्यातून एकूण 115 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी 65 कोटी रुपये रिकव्हर केले आहेत. काँग्रेस पक्षाने आज आयकर अपीलीय न्यायाधिकरणाकडे (आयटीएटी) संपर्क साधून रिकव्हरीच्या विरोधात तक्रार दाखल केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यातून ही रक्कम रिकव्हर केली. दरम्यान, काँग्रेसने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आयकर विभागाने न्यायाधिकरणासमोर झालेल्या सुनावणीच्या निकालाची वाट न पाहता बँकेत असलेल्या शिल्लक रकमेतून ही रक्कम रिकव्हर केली.

Sonia Gandhi & Rahul Gandhi
Sonia Gandhi Retirement: सोनिया गांधी सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार; रायपूर अधिवेशनात दिले संकेत

न्यायाधिकरणाने यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले

दरम्यान, काँग्रेस पक्षाचा स्थगिती अर्ज निकाली निघेपर्यंत आयकर विभागाने कारवाई करु, असे काँग्रेसने म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ITAT ने या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत यथास्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रकरण आज दुपारी अडीच वाजेपर्यंत नोंदवण्यात आले.

आयकर विभागाची कारवाई लोकशाहीविरोधी: काँग्रेस

कॉग्रेस नेते अजय माकन यांनी सांगितले की, ''आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने काँग्रेसविरोधात आयकर विभागाने जारी केलेल्या 210 कोटी रुपयांच्या वसुलीच्या नोटीसला स्थगिती दिली आहे. तरीही आयकर विभागाने पक्षाच्या बँक खात्यातून पैसे काढून 'अलोकशाही कारवाई' केली.'' माकन यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “केंद्र सरकारच्या एजन्सीद्वारे अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत, ज्यामुळे भारताच्या बहु-पक्षीय लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. हे थांबवले नाही तर भारतातील लोकशाही संपुष्टात येईल. त्याचबरोबर न्यायपालिकेने हस्तक्षेप केला नाही तर आपली लोकशाही मूल्ये धोक्यात येतील.'' दुसऱ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये माकन यांनी लिहिले की, “काल संध्याकाळपासून काँग्रेस सरकारी यंत्रणेच्या अलोकतांत्रिक कारवाईची बळी ठरली आहे. मात्र आमचा भारताच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.”

आयटी ट्रिब्युनलने गेल्या आठवड्यात दिलासा दिला होता

आयकर विभागाने गेल्या शुक्रवारी काँग्रेसची अनेक बँक खाती गोठवली होती. 210 कोटींच्या वसुलीच्या मागणीच्या आधारे आयकर विभागाने काँग्रेसवर ही कारवाई केली होती. परंतु नंतर आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने बँक खाती गोठवण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आणि पुढील सुनावणीपर्यंत त्यांना ती वापरण्याची परवानगी दिली. दरम्यान कॉंग्रेस नेते अजय माकन आणि सुनावणीत काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ वकील विवेक तनखा यांनी त्यावेळी सांगितले होते की, ''न्यायाधिकरणाने काँग्रेसच्या खात्यात जमा असलेल्या रकमेतून 115 कोटी रुपये रोखून धरले आहेत आणि उर्वरित रक्कम खर्च करण्यास परवानगी दिली आहे.'' विवेक तनखा यांनी त्यावेळी असेही सांगितले होते की, काँग्रेसची खाती गोठवली तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष ‘निवडणुकीच्या उत्सवात’ सहभागी होऊ शकणार नाही, असे त्यांनी न्यायाधिकरणाला सांगितले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी याला सरकारचा लोकशाहीवरचा हल्ला म्हणत जोरदार टीका केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com