काँग्रेसला मोठा झटका, Jayveer Shergill यांनी राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा दिला राजीनामा

Congress Leader Jayveer Shergill: काँग्रेस नेते जयवीर शेरगिल यांनी बुधवारी राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.
Jayveer Shergill
Jayveer ShergillDainik Gomantak
Published on
Updated on

Congress Leader Jayveer Shergill: काँग्रेस नेते जयवीर शेरगिल यांनी बुधवारी राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. जयवीर शेरगिल हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) व्यवसायाने वकील आहेत. सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामा पत्रात शेरगिल यांनी म्हटले आहे की, पक्षात “स्वार्थी हितसंबंधांच्या प्रभावाखाली” निर्णय घेतले जात आहेत.

दरम्यान, त्यांनी राजीनामा दिलेल्या पत्रात लिहिले की, "मला हे सांगताना खेद वाटतो की, आता देशाच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत, तर ते लोकांच्या स्वार्थी हितसंबंधांमुळे प्रभावित होतात. वरिष्ठ नेतृत्व सातत्याने वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहे." राजीनामा देण्यापूर्वी ते काँग्रेसचे (Congress) सर्वात तरुण राष्ट्रीय मीडिया पॅनेलचे सदस्य होते.

Jayveer Shergill
Congress : महागाईविरोधात काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

दुसरीकडे, गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पत्रकार परिषद घेऊ दिली जात नव्हती. शेरगिल यांचा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा पक्षाचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) आणि आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी त्यांना सोपवलेल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com