...म्हणून पडली TMC आणि I-PACमध्ये वादाची ठिणगी

कोलकाता महानगरपालिका (KMC) निवडणुकीत किशोर आणि त्यांच्या टीमने दिलेल्या सूचना TMC ने नाकारल्या होत्या.
Mamata Banerjee and Prashant Kishor
Mamata Banerjee and Prashant Kishor Dainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि त्यांचा I-PAC संस्थेसोबतचा करार संपवण्याच्या चर्चेला सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपावरून गोंधळ झाला आहे. या पार्श्वभूमीवर करार संपवण्याची चर्चा सुरू झाल्याचे समोर येत आहे. (TMC Mamata Banerjee)

Mamata Banerjee and Prashant Kishor
प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्थेवर गोव्यात छापा

तृणमूल कॉंग्रेस नेते पार्थ चॅटर्जी शुक्रवारी महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर करत असताना पक्षाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दुसरी उमेदवार यादी अपलोड करण्यात आली होती. ही यादी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना विश्वासात न घेता I-PAC द्वारे बनवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

I-PAC सोबतचा करार संपुष्टात आणण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे, असे TMC नेत्याने सांगितले. अधिकृत नेत्यांची स्वाक्षरी नसल्याचे सांगत पक्षाने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवरील यादी नामंजूर केली. सोशल मीडियावरील यादीत अनेकांची नावे आढळून आली मात्र ती नावे अधिकृत यादीत नसल्याने राज्यभरात आंदोलने झाली.

Mamata Banerjee and Prashant Kishor
इंडियन रेल्वे प्रवाशांना देणार व्हॅलेटाईंन डे च्या दिवशी स्पेशल गिफ्ट

आम्ही आमच्या आमदारांनी तसेच I-PAC ने शिफारस केलेल्या लोकांना प्राधान्य दिले. किशोर यांच्या टीमने शिफारस केलेली काही नावे पक्षाच्या आदेशावरून अंतिम यादीतून वगळण्यात आली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील यादी पाहून आम्हाला आश्चर्य वाटले, टीएमसी नेते म्हणाले. ते पुढे म्हणाले, हे कृत्य आमच्या पक्षाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवणाऱ्या I-PAC टीमचे असू शकते. मात्र, I-PAC ने ही यादी अपलोड केल्याचे नाकारले.

कोलकाता महानगरपालिका (KMC) निवडणुकीत किशोर आणि त्यांच्या टीमने दिलेल्या सूचना TMC ने नाकारल्या होत्या. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले, त्यांच्या टीमने KMC निवडणुकीत (Election) आमच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागी अनेक नवीन चेहऱ्यांची शिफारस केली होती. मात्र, आम्ही ती नावे अमान्य केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com