

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर दरात सत्तर रुपयांपर्यंत वाढ केली आहे. दुसरीकडे १४ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत.
तर विमानाच्या इंधन दरात (एटीएफ) प्रतिलिटरमागे १६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ताज्या दरवाढीनंतर एटीएफचे दर १२१ रुपयांवरून १३७ रुपयांवर गेले आहेत. साहजिकच ‘एटीएफ’ दरवाढीमुळे आता विमान प्रवास बराच महागणार आहे.
वस्तूंचीही तिसऱ्यांदा दरवाढ
कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी, फ्रीज यांच्या किमतीत तीन ते अाठ टक्क्यांची वाढ केली आहे. चालू वर्षी झालेली ही तिसरी दरवाढ आहे. कॉपर, स्टील, ॲल्युमिनियम आणि कच्च्या तेलासह अन्य इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे वस्तूंचे दर वाढवावे लागत असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.