UP Election: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधकांवर कडाडले

सुमारे 14 मिनिटांच्या भाषणात योगी आदित्यनाथ यांनी सरकारच्या कामांचा पाढा वाचून दाखवला.
Yogi Adityanath
Yogi AdityanathDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्र येथील भाषणात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, सपा-बसपा सरकार असते तर कोरोनाची लस काळ्या बाजारात विकली गेली असती. भाजप (BJP) सरकारने सर्वांना मोफत लस दिली. (UP Election News)

Yogi Adityanath
प्रवाशांनी रेल्वेला धक्का मारत मोठा अनर्थ टाळला; व्हिडिओ व्हायरल

सीएम योगी पुढे म्हणाले, हे लोक (विरोधक) स्वतः गरीब आणि आदिवासींचे रेशन खातात. बहनजीच्या हत्तीचे पोट इतके मोठे होते की ते भरण्यासाठी संपूर्ण राज्याचे रेशन कमी पडायचे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सर्वांगीण विकासासाठी भाजपला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. सुमारे 14 मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारच्या कामांचा पाढा वाचून दाखवला.

सीएम योगी म्हणाले की, एकीकडे आम्ही विकासकामे करत आहोत आणि दुसरीकडे गरिबांच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर बुलडोझर चालवत आहोत. बुलडोझर चालवायचा की नाही, असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला. बुलडोझर चालवण्यासाठी मजबूत सरकार हवे आहे. मजबूत सरकारसाठी कमळ चिन्हावर मतदान करा, असे ते म्हणाले.

Yogi Adityanath
विक्री दारु अन् बिअरची, मग भारतात Wine Shop का म्हणतात?

आश्वासनांचा पाढा

सीएम योगी यांनी दूधी येथे आयोजित जाहीर सभेत घोषणा केली की, येत्या काही दिवसांत उज्ज्वलाच्या प्रत्येक लाभार्थ्याला होळी-दिवाळीच्या काळात मोफत गॅस सिलिंडर दिले जातील. 60 वर्षांवरील महिलांना बसमधून (Bus) मोफत प्रवास दिला जाईल. मुलीच्या शिक्षणासाठी कन्या सुमंगला योजनेंतर्गत 15 ठिकाणी 25 हजारांची रक्कम दिली जाणार आहे. मुख्यमंत्री विवाह योजनेतील रक्कम 51 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाला नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com