CM Rekha Gupta Attacked: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, जनता दरबार सुरु असताना घडला प्रकार; आरोपी ताब्यात

Delhi CM Rekha Gupta Attacked: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज एका इसमाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली.
CM Rekha Gupta Attacked
CM Rekha Gupta AttackedDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका इसमाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली.

मुख्यमंत्री गुप्ता सकाळी सव्वा आठच्या सुमारास जनतेच्या तक्रारी ऐकून घेत असताना ही घटना घडली. हल्लेखोराचे नाव राजेश सकरिया असे असून तो गुजरातमधील राजकोटचा राहणारा आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून चौकशी सुरू केली आहे. 

CM Rekha Gupta Attacked
Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

मुख्यमंत्री गुप्ता या ‘सिव्हील लाईन्स’ येथील निवासस्थानी सकाळी जनता दरबारात सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकून घेत असताना गर्दीत तक्रारकर्ता म्हणून उभा असलेल्‍या ४१ वर्षीय राजेश खिमजी याने त्‍यांच्‍यावर हल्ला केला.

CM Rekha Gupta Attacked
Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, आरोपीने स्वतःची ओळख राजेश भाई खिमजी भाई सकारिया अशी करून दिली आहे. आरोपी राजकोटचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे वय सुमारे ४१ वर्षे आहे. सूत्रांनुसार, दिल्ली पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला आहे. पोलिस आरोपीने दिलेल्या नाव आणि पत्त्याची पडताळणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com