

पश्चिम बंगाल: भारत दौऱ्यावर आलेल्या अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सीच्या कार्यक्रमस्थळी तूफान राडा झाला आहे. मेस्सीची एकही झलक पाहण्यास न मिळाल्याने उपस्थित हजारो चाहते आक्रमक झाले व त्यांनी मैदानात राडा घातला.
चाहत्यांनी मैदानात पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या फेकल्या तर, मैदानावर उभारण्यात आलेले टेंटही उखडले. यात काहीजण जखमी देखील झाले आहेत. याप्ररकरणी गंभीर दखल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली असून, त्यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
लिओनल मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला असून, त्यांने पहिल्याच दिवशी कोलकत्यात त्याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी बॉलिवूड स्टार शाहरुख खानही उपस्थित होता. याशिवाय क्रीडा विश्वातील अधिकारी आणि सरकारी नेतेही उपस्थित होते.
पण, सॉल्ट लेक मैदानावर जिथे हा कार्यक्रम झाला त्याठिकाणी नियोजन व्यवस्थित न केल्याने मेस्सीच्या चाहत्यांनी त्याची एक झलकही पाहता आली नसल्याने चाहते आक्रमक झाले व त्यांनी मैदानावर उतरत साहित्याची मोडतोड करण्यास सुरुवात केली.
राज्याच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, घडलेल्या प्रकाराबाबात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"सॉल्ट लेक मैदानावरील गैरनियोजनाचा मला चांगलाचा धक्का बसला आहे. हजारो क्रीडा प्रेमींसह मी देखील कार्यक्रमस्थळी येण्यासाठी निघाले होते. लिओनल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी अनेकजणांनी हजेरी लावली होती", असे ममता म्हणाल्या.
घडलेल्या प्रकाराबाबत मी मेस्सीची माफी मागते. याशिवाय हजारो क्रीडा प्रेमी आणि मेस्सीच्या चाहत्यांचीही माफी मागते. या घटनेची चौकशी करण्यासाठी मी निवृत्त न्यायमूर्त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करत आहे, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी एक्सवरुन दिली आहे.
निवृत्त न्यायमूर्ती अशीम कुमार राय यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यात मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, गृह खात्याचे अधिकारी देखील असतील, असे ममता यांनी स्पष्ट केले आहे.
कार्यक्रमाचा आयोजक ताब्यात
राज्याचे पोलिस महासंचालक राजीव कुमार यांनी याप्रकरणाची माहिती देताना कार्यक्रमाचा मुख्य आयोजकाला ताब्यात घेतल्याचे सांगितले. या गैरनियोजनाबाबत शिक्षा होईल, यासाठी योग्य कार्यवाही केली जात असल्याचेही त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.