bhagwant man
bhagwant mandainik gomantak

पंजाब : खासगी शाळांच्या फी वाढीवर बंदीसह 'या' गोष्टींवर मान सरकारचा मोठा निर्णय

पंजाब सरकारचा शिक्षणाबाबत मोठा निर्णयच; कोणतीही शाळा पालकांना 'हे' सांगू शकत नाही...
Published on

पंजाब : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच भगवंत मान यांनी धडाधड असे ऐतिहासिक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्यांनी जे निर्णय घेतले त्यांचे सर्वसामान्यांतून स्वागत होत आहे. मान यांनी सत्ता हाती घेताच कायमस्वरूपी नोकरी आणि हंगामी कर्मचारी केल्यानंतर आता भगवंत मान यांनी शिक्षण क्षेत्रात बदलांच्या मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी बुधवारी शिक्षण क्षेत्रात दोन मोठे निर्णय घेत कोणत्याही खासगी शाळेला फी वाढ करता येणार नाही असे म्हटले आहे. दुसऱ्या दुसऱ्या निर्णयानुसार, कोणतीही शाळा पालकांना विशिष्ट दुकानातून पुस्तक किंवा ड्रेस खरेदी करण्यास सांगणार नाही असे म्हटले आहे. (CM Bhagwant Mann has said that no school will ask any particular shop to buy books and clothes

यासंदर्भात मुख्यमंत्री मान (CM Bhagwant Mann) म्हणाले की, पंजाब सरकारने (Government of Punjab) शिक्षणाबाबत दोन मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील खासगी शाळांना या सत्रातील प्रवेश शुल्कात वाढ न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि हे तत्काळ लागू असेल. तर दुसरा निर्णय हा पालकांना डोळ्यासमोर ठेऊन तर खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला आळा बसावा म्हणून घेण्यात आला आहे. यामध्ये कोणतीही खाजगी शाळा (Private school) पालकांना गणवेश आणि पुस्तके खरेदी करण्यासाठी विशिष्ट दुकानात जाण्यास सांगणार नाही. शाळा त्यांची पुस्तके (books) आणि गणवेश (Uniform) त्या भागातील सर्व दुकानांवर उपलब्ध करून देतील. पालक त्यांच्या आवडीच्या कोणत्याही दुकानातून खरेदी करू शकतात. मान म्हणाले की पंजाबमध्ये शिक्षण इतके महाग झाले आहे की ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. माणवाचा तिसरा डोळा माणल्या जाणाऱ्या शिक्षणाचे (Education) बाजारीकरण होऊ देणार नाही.

विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडवून आणण्याची हमी दिली होती. तत्कालीन शिक्षणमंत्री परगट सिंह आणि मनीष सिसोदिया यांच्यातही शिक्षणाच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. मात्र त्यानंतर निवडणुकीत 'आप'ने दणदणीत विजय मिळवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com