'आम आदमी आंबा नाहीतर काय मशरुम खाणार?'; केजरीवालांच्या याचिकेवर घमासान; कोर्टाने आदेश ठेवला राखून

Delhi CM Arvind Kejriwal: तिहार तुरुंगात बंद असलेल्या केजरीवालांनी आपल्या याचिकेत डॉक्टरांशी 15 मिनिटांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी केली.
Delhi CM Arvind Kejriwal
Delhi CM Arvind KejriwalDainik Gomantak

Arvind Kejriwal Lawyers Arguments In Court: मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज (शुक्रवारी) न्यायालयात जोरदार घमासान पाहायला मिळाले. तिहार तुरुंगात बंद असलेल्या केजरीवालांनी आपल्या याचिकेत डॉक्टरांशी 15 मिनिटांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी केली. त्याचवेळी, ईडीने याला विरोध करत यावर एम्सच्या डॉक्टरांचे ओपिनियन घेण्याचा युक्तिवाद केला.

22 एप्रिल रोजी न्यायालय निर्णय देणार!

दरम्यान, राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या याचिकेवरील आपला निर्णय 22 एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या याचिकेवर तिहार तुरुंग प्रशासन आणि ईडीला 20 एप्रिलपर्यंत न्यायालयात आपली बाजू मांडायची आहे.

Delhi CM Arvind Kejriwal
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा; म्हापसा कोर्टाने लाचखोरीची तक्रार फेटाळली

मधुमेह असूनही मुख्यमंत्री आंबा खातात

ईडी आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांची बाजू मांडणारे वकील यांच्यात न्यायालयात जोरदार वादावादी झाली. ईडीने आरोप केला की, मधुमेह असूनही मुख्यमंत्री आंबे खातात, आलू-पुरी खातात. यावर मुख्यमंत्र्यांचे वकील रमेश गुप्ता यांनी विरोध दर्शवत आम आदमीच आंबा खात असल्याचे सांगितले. आम आदमी आंबा नाहीतर मशरुम खणार?

एक वेळा आलू-पुरीचे जेवण केले

केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, केजरीवाल 22 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आहेत, त्यांना दररोज इन्सुलिनची आवश्यकता आहे. त्यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली, तेव्हापासून ते त्यांच्या शुगर चार्टचे पालन करु शकलेले नाहीत. पुढे, ईडीच्या आरोपांवर न्यायालयात स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, घरुन 48 वेळा पाठवलेल्या जेवणापैकी केजरीवाल यांनी नवरात्रीचा प्रसाद म्हणून फक्त एकदाच आलू-पुरी खाल्ली.

Delhi CM Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Arrested: ''Dear Brother वेलकम टू तिहार'', सुकेश चंद्रशेखरचं केजरीवालांना पत्र

आंबा फक्त तीन वेळा पाठवला गेला

केजरीवाल यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, ते त्यांच्या चहामध्ये शुगर फ्री चा वापर करतात. याशिवाय आंबा खाण्याबाबत ईडीचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. केजरीवाल यांना केवळ तीन वेळा तुरुंगात पाठवण्यात आले. आठ एप्रिलनंतर त्यांच्याकडे एकही आंबा पाठवण्यात आलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com