Video: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, 2 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली आहे.
Amarnath Gufa
Amarnath GufaDainik Gomantak
Published on
Updated on

Amarnath Gufa: जम्मू-काश्मीरमधील अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. दुसरीकडे, एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने अमरनाथमध्ये खराब हवामानाचा अंदाज वर्तवला होता.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ गुहेपासून दोन किलोमीटर अंतरावर ढगफुटीची घटना घडली आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सखल भागात ढगफुटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी फोनवरुन चर्चाही केली. मिळालेल्या माहितीनुसार, ढगफुटीनंतर प्रशासनाची टीम परिस्थितीचा अंदाज घेत आहे. सध्या नुकसानीचे कोणतेही अधिकृत वृत्त नाही.

दुसरीकडे, पहलगाम पोलिसांनी सांगितले की, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि बचाव यंत्रणांकडून बचावकार्य सुरु आहे. आयटीपीचे म्हणणे आहे की, काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे, अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. बचाव पथके युध्दपातळी काम करत आहेत. इतर एजन्सीसह ITBP ची टीम बचाव कार्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com