बारावीच्या विद्यार्थ्याची शिक्षिकेसमोरच चाकूने भोकसून हत्या

परीक्षेदरम्यानच बारावीच्या विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्याशी झाला वाद
class 12th exam teacher classroom students murder stabbing in haryana karnal
class 12th exam teacher classroom students murder stabbing in haryana karnalDainik Gomantak
Published on
Updated on

हरियाणातील कर्नाल येथील हरिसिंग पुरा गावात एका खाजगी शाळेच्या वर्गात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केली. ही संपूर्ण घटना शाळेच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून आज पुन्हा वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हरसिंगपुरा गावातील संस्कार भारती या खासगी शाळेत गुरुवारी बारावीचे प्रात्यक्षिक होते. सकाळी नऊच्या सुमारास परीक्षा सुरू होणार होती.

परीक्षेदरम्यानच बारावीच्या विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्याशी वाद झाला. दोन विद्यार्थ्यांमधील वाद इतका वाढला की, एका विद्यार्थ्याने दुसऱ्याची चाकूने वार करून हत्या (Murder) केली. ही घटना घडली त्यावेळी वर्गात मुले उपस्थित होती. गुन्हा करून आरोपी विद्यार्थ्याने घटनास्थळावरून पळ काढला.

class 12th exam teacher classroom students murder stabbing in haryana karnal
आता शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार 'एवढी' रक्कम, असा घ्या लाभ

या घटनेनंतर मुलांनी शाळेच्या आवारात इकडे-तिकडे धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला वर्गात रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून शाळेच्या आवारात एकच खळबळ उडाली. विद्यार्थी इकडे तिकडे धावू लागले.

गंभीर जखमी विद्यार्थ्याला (Student) उपचारासाठी घारौंडा येथील कम्युनिटी सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी त्याला कर्नाल येथे रेफर केले. कर्नाल येथील डॉक्टरांनी त्यांना मृत (Death) घोषित केले. याआधीही दोघांमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या वैमनस्यातून विद्यार्थ्याच्या हत्येचा संबंध आहे. शाळेत झालेल्या हत्येनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी (police) घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरू केला. त्याचबरोबर खबरदारी म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com