Supreme Court: ''चुप, एकदम चुप'', कोर्टरुममध्ये CJI वकिलावर भडकले; म्हणाले- 23 वर्षात असं कधीच घडलं नाही

CJI DY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयात आज एक दुर्लभ घटना घडली, जेव्हा सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड कोर्टरुममध्ये एका वकिलावर चिडले.
CJI DY Chandrachud
CJI DY ChandrachudDainik Gomantak
Published on
Updated on

CJI DY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयात आज एक दुर्लभ घटना घडली, जेव्हा सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड कोर्टरुममध्ये एका वकिलावर चिडले. एका याचिकेच्या लिस्टिंगच्या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा सुरु असताना, CJI चंद्रचूड यांनी एका वकिलाला त्याच्या टोनबद्दल फटकारले आणि न्यायालयाला धमकावण्याच्या प्रयत्नांविरुद्ध कठोर इशारा दिला.

दरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड भंयकर संतापलेले दिसले. त्यांनी वकिलाला मोजक्या शब्दात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. वकील सरन्यायाधीशांशी मोठ्याने बोलत असताना, चंद्रचूड म्हणाले की, "एक सेकंद, आधी तुमचा आवाज कमी करा. तुम्ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहात. तुमचा आवाज कमी करा, नाहीतर आम्ही तुम्हाला न्यायालयाबाहेर काढू."

CJI DY Chandrachud
Supreme Court: सुप्रीम कोर्टाने वाचवला अमेरिकन मुलाचा जीव, भारतीय नातेवाईकास दिली यकृत प्रत्यारोपणाची परवानगी!

वकिलाच्या सामान्य कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरन्यायाधीशांनी विचारले की, "तुम्ही सहसा कुठे दिसता? तुम्ही प्रत्येक वेळी न्यायाधीशांवर असे ओरडता का?" कोर्टरुममध्ये मर्यादा राखण्याच्या महत्त्वावर भर देत सरन्यायाधीश म्हणाले की, "कृपया आधी तुमचा आवाज कमी करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या मोठ्या आवाजाने आम्हाला घाबरवू शकता, तर तुम्ही चुकीचे आहात. 23 वर्षांत असे कधी घडले नाही. आणि माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षातही असे घडणार नाही.''

यानंतर सरन्यायाधीश संतापले आणि म्हणाले की, "चुप, एकदम चुप. आत्ता ही कोर्टरुम सोडा. तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही!" सरन्यायाधीशांच्या कडक इशाऱ्याने भांबावलेल्या या वकिलाने ताबडतोब माफी मागितली आणि अधिक नम्रपणे बोलायला सुरुवात केली. याआधीही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी वरिष्ठ वकील विकास सिंह यांना मोठ्याने बोलल्यामुळे खडसावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com