CJI Chandrachud: बार असोसिएशन आणि कौन्सिल म्हणजे 'ओल्ड बॉईज क्लब', असं का म्हणाले सीजेआय चंद्रचूड?

Bar Association And Bar Council: सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी देशभरातील बार कॉन्सिल आणि बार असोसिएशनमध्ये महिलांच्या कमतरतेवर नाराजी व्यक्त केली आहे.
CJI Chandrachud
CJI ChandrachudDainik Gomantak

CJI Chandrachud Calls Bar Association And Bar Council As Old Boys Club: सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी देशभरातील बार कॉन्सिल आणि बार असोसिएशनमध्ये महिलांच्या कमतरतेवर नाराजी व्यक्त केली आहे. वकील संघटनांमध्ये महिलांच्या कमी प्रतिनिधित्वावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, वकिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांमध्ये महिलांच्या निवडीसाठी अनुकूल परिस्थितीचा अभाव आहे. त्यामुळे वकिलांच्या संघटना, म्हणजे बार असोसिएशन आणि बार कौन्सिल हे ‘ओल्ड बॉईज क्लब’ बनले आहेत.

तथापि, चंद्रचूड म्हणाले की अलिकडच्या वर्षांत महिला वकिलांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे, तरीही निवडून आलेल्या बार कौन्सिल आणि बार असोसिएशनमध्ये त्यांचा सहभाग अद्याप वाढलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हायकोर्ट बार असोसिएशनच्या तीन दिवसीय शताब्दी सोहळ्यात सरन्यायाधीश बोलत होते.

CJI Chandrachud
CJI Chandrachud: 'अन् म्हणून मला सोशल मीडियावर ट्रोल केलं' सरन्यायाधीशांनी सांगितली आपबीती

आपल्या भाषणादरम्यान CJI चंद्रचूड यांनी विचारले की, "महिला वकिलांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली असली तरीही, ही गती आणि कल आमच्या निवडून आलेल्या बार असोसिएशन किंवा बार कौन्सिलच्या रचनेत का दिसून येत नाही. जेव्हा कोणताही औपचारिक अडथळा नाही आणि महिला वकिलांची संख्याही सातत्याने वाढत आहे, मग प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे की अधिकाधिक महिला बार असोसिएशन किंवा बार कौन्सिलच्या निवडणुका का लढत नाहीत आणि का जिंकू शकत नाहीत?

CJI चंद्रचूड यांनी बार असोसिएशनच्या सदस्यांच्या प्रलंबित प्रकरणांवर आणि न्यायालयांनी दिलेल्या निकालांवर भाष्य करण्याच्या प्रवृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, असे बार आणि बेंचने म्हटले. बारसह न्यायव्यवस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये एकही महिला अधिकारी नसल्याबद्दल सरन्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली. तसेच, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या कार्यकारिणीत एकच महिला सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

CJI Chandrachud
CJI DY Chandrachud: ''कायद्याचे शिक्षण दुर्गम भागापर्यंत पोहोचवले पाहिजे...''; CJI चंद्रचूड यांनी सांगितल्या महत्त्वाच्या गोष्टी!

2021 च्या अहवालाचा दाखला देत ते म्हणाले की, 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्य बार कौन्सिलमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींपैकी केवळ 2.04 टक्के महिला आहेत. सरन्यायाधीशांनी महिला वकिलांनाही बार असोसिएशनमध्ये त्यांचे स्थान मजबूत करण्याचे आवाहन केले. महिलांनी निवडणूक लढवून जबाबदारीची पदे भूषवावी असे आवाहनही त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com