CJI Chandrachud: ''खपूच खराब मॅनर्स, खाली बसा''; सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलावर चांगलेच संतापले; वाचा नेमकं काय घडलं?

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड हे त्यांच्या कठोर निर्णयांसाठी आणि सुनावणीदरम्यान दिलेल्या टिप्पण्यांसाठी ओळखले जातात.
CJI Chandrachud
CJI ChandrachudDainik Gomantak

CJI Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड हे त्यांच्या कठोर निर्णयांसाठी आणि सुनावणीदरम्यान दिलेल्या टिप्पण्यांसाठी ओळखले जातात. कोर्टरुममध्ये जेव्हा कोणी शिस्त मोडते तेव्हा CJI चंद्रचूड यांना अजिबात आवडत नाही. आज एका वकिलावर सरन्यायाधीश चांगलेच संतापलेले दिसले. वकिल महोदय सतत मधेमधे बोलत होते. त्यानंतर सरन्यायाधीश भडकले.

न्यायालयीन कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या 'बार अँड बेंच' या वेबसाइटनुसार, एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ निकाल देत असताना एक वकील महोदय मधेमधे बोलत होते. सीजेआय चंद्रचूड यांना हे आवडले नाही आणि त्यांनी त्या वकिलाला चांगलेच सुनावले. CJI चंद्रचूड म्हणाले की, “तुम्ही उच्च न्यायालयातही असेच करता का? हा अत्यंत चुकीचा शिष्टाचार आहे. कृपया बसा.''

CJI Chandrachud
Supreme Court: "निवडणुकीपूर्वी किती लोक तुरुंगात जातील?", सुप्रीम कोर्टाने YouTuber सत्ताईचा जामीन केला मंजूर

त्याचवेळी, दुसऱ्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सीजेआय चंद्रचूड यांनी ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांना पुढील वेळी फाइल्सऐवजी आयपॅड आणण्यास सांगितले. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, "महोदय अहमदी, पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला लॅपटॉप किंवा आयपॅडसह भेटू इच्छितो," यावर वकील अहमदी यांनी उत्तर दिले की, 'लॉर्डशिप, मी प्रयत्न करेन.'

CJI Chandrachud
Supreme Court: केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक युनिटवर SC ने घातली बंदी; ''हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोका''

CJI चंद्रचूड याआधीही अनेकदा नाराज झाले आहेत

आपल्या कठोर टिप्पणीसाठी ओळखले जाणारे CJI चंद्रचूड यांनी यापूर्वीही अनेकदा फटकारले आहे. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी एका वकिलाला म्हणाले होते की, 'हा प्लॅटफॉर्म नाही... कोणतीही ट्रेन आली आणि तुम्ही त्यात चढलात.' वकिलाने न्यायव्यवस्थेतील सुधारणांशी संबंधित एका याचिकेचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला होता. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारले होते की, 'कोणतीही याचिका बोर्डवर आहे का? दुपारी 12 वाजता तुम्ही याचा उल्लेख कसा करु शकता. तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयातही उभे राहून याचिका दाखल करता का? सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, हा प्लॅटफॉर्म नाही जिथे तुम्ही कोणतीही ट्रेन येते. कृपया तुम्ही तुमच्या सिनियर्संना यासंबंधीची प्रोसेस विचारा.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com