Chinese Visa Scam: कार्ति चिदंबरम यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल

2011 मध्ये 263 चिनी नागरिकांना व्हिसा देण्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ED ने बुधवारी काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे.
Karti Chidambaram
Karti ChidambaramDainik Gomantak
Published on
Updated on

2011 मध्ये 263 चिनी नागरिकांना व्हिसा देण्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम (Karti Chidambaram) आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे. कार्ती यांचे वडील पी चिदंबरम (P. Chidambaram) जेव्हा देशाचे गृहमंत्री होते तेव्हा हा कथित घोटाळा झाला होता. कार्ति यांनी या कारवाईचा आधीच इन्कार केला असून सीबीआयने माझ्यावर लावलेले आरोप निरर्थक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. (Chinese Visa Scam Money laundering case filed against Karti Chidambaram)

Karti Chidambaram
इंस्टाग्राम झाले डाउन , वापरकर्त्यांना लॉगिनच्या समस्यांचा करावा लागतोय सामना

तपास एजन्सीशी संबंधित अधिकार्‍यांनी बुधवारी सांगितले की फेडरल एजन्सीने याच प्रकरणात नुकत्याच झालेल्या केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) एफआयआरची दखल घेत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत गुन्हा देखील नोंदविला आहे.

कार्तिच्या जवळच्या लोकांच्या कंपनीवर आरोप

सीबीआय एफआयआरमध्ये म्हटले आहे की हे प्रकरण वेदांत समूह कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (टीएसपीएल) च्या उच्च अधिकाऱ्याने कार्ति आणि त्याचा जवळचा सहकारी एस भास्कर रमण यांना 50 लाख रुपयांची लाच दिल्याच्या आरोपांशी संबंधित असल्याचे म्हटले आहे तसेच तलवंडी साबो पॉवर लिमिटेड पंजाबमध्ये वीज प्रकल्प उभारत होती.

तपासाचा भाग म्हणून आरोपींची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. कार्ति चिदंबरम यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि 'जर ही छळवणूक नाही, एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर कारवाई होत नसेल तर काय आहे', असे म्हटले गेले आहे.

Karti Chidambaram
"अटलबिहारी वाजपेयींनी मला पासपोर्ट मिळवून दिला कारण...": यासिन मलिक

सीबीआयने नोंदवला गुन्हा

लोकसभा खासदार कार्ति चिदंबरम यांच्यावर तलवंडी साबो पॉवर लिमिटेड प्रकल्पात काम करणाऱ्या चिनी अभियंत्यांना लाच घेऊन व्हिसा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला. या संदर्भात, 17 मे रोजी कार्ति चिदंबरमच्या चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, ओडिशा येथील सुमारे नऊ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत.

सीबीआयने भूतकाळातील आणखी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर काही दिवसांनी, कार्ती चिदंबरम यांनी मंगळवारी हे छळवणूकीचे कृत्य असल्याचे म्हटले आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले आहे. तामिळनाडूच्या शिवगंगा येथील खासदार कार्ती यांच्यावर सीबीआयने 50 लाख रुपयांची लाच घेऊन 11 वर्षांपूर्वी एका ऊर्जा कंपनीत काम करणाऱ्या 263 चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कार्ति यांचे वडील पी चिदंबरम हे प्रकरण घडण्यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते.

यावर कार्ति म्हणाले की, “मला भीती वाटत नाही की केंद्र सरकार (Central government) पुन्हा एकदा आपल्या एजन्सींचा वापर करून माझ्यावर दुर्भावनापूर्ण आणि पूर्णपणे बनावटीचे आरोप करत आहे. यापूर्वी एका खुनाच्या खटल्यातील संशयिताच्या जबाबाच्या आधारे एजन्सी माझ्या मागे लागली होती. कार्ति पुढे म्हणाले की, “मी ठामपणे सांगू शकतो की या व्हिसा प्रकरणाशी माझा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे, दूरपर्यंत काहीही संबंध नाहीये. सीबीआयने माझ्यावर लावलेले सर्व आरोप मूर्खपणाचे आहेत. गेल्या मंगळवारी, CBI ने चिदंबरम यांच्या चेन्नई आणि दिल्लीतील निवासस्थानांसह देशातील अनेक शहरांमध्ये 10 ठिकाणी समन्वित शोध मोहीम देखील राबवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com