लडाखमधील (Ladakh) सीमा वादाबाबत चीन (China) भारतावर (India) सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच चिनी माध्यमांमधील एका वादग्रस्त लेखात असे म्हटले होते की, चीन आपल्या भूभागाबाबत भारताशी कोणत्याही प्रकारचा करार करणार नाही आणि युद्ध झाल्यास चीन भारताला हरवू शकेल. चीनच्या प्रतिष्ठित ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या या लेखानंतर आता चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजियान (Zhao Lijian) यांनीही एक वादग्रस्त विधान केले आहे.(China talk about Venkaiah Naidu visit Arunachal Pradesh)
चीन तथाकथित बेकायदेशीररित्या तयार केलेले अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) ओळखत नाही असे सांगतच चीनने भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या अरुणाचल प्रदेशाच्या भेटीला तीव्र विरोधही करत आहे . विशेष म्हणजे चीन आपला दावा मांडताना अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा एक भाग असल्याचा दावा देखील करताआहे.
चीनच्या या वक्तव्यानंतर भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. चीनच्या अधिकृत प्रवक्त्याने केलेली विधाने आम्ही पाहिली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्ही ही विधाने नाकारतो असे सांगत अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले आहे . भारतीय नेते भारताच्या इतर कोणत्याही राज्यात जात असताना, ते नियमितपणे अरुणाचल प्रदेशला भेट देतात. भारतीय नेत्यांच्या भारतातील एखाद्या राज्याच्या भेटीला आक्षेप घेणे हे भारतीयांच्या तर्क आणि समजण्याच्या पलीकडचे आहे असे प्रतिउत्तर दिले आहे.
याआधीही चीनने अरुणाचल प्रदेशात येणाऱ्या सर्व मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत आपला आक्षेप नोंदवला होता . तिबेटी धर्मगुरू दलाई लामा वगळता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये अरुणाचल प्रदेशला भेट दिली होती आणि चीनने या सर्व भेटींवर आक्षेप घेत त्यावेळी देखील एक निवेदन जारी केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.