Video: सुकून...! 'त्याला पाहताच चिंपाझीनं मारली मिठी, आनंदाला पारावार उरला नाही' हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Emotional Chimpanzee Video: व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येते की, जेव्हा चिंपांझीचा जुना केयरटेकर त्याला भेटायला येतो तेव्हा तो त्याला पाहून खूप आनंदी होतो.
Emotional Chimpanzee Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Emotional Chimpanzee Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, रिल्स व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चिंपांझी त्याच्या जुन्या केयरटेकरला भेटून इतका आनंदी होतो की, तो त्याला पाहताच मिठी मारतो. हा हृदयस्पर्शी क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

केयरटेकरला पाहून चिंपांझी आनंदाने उड्या मारतो

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येते की, जेव्हा चिंपांझीचा जुना केयरटेकर त्याला भेटायला येतो तेव्हा तो त्याला पाहून खूप आनंदी होतो. जुन्या केयरटेकरला पाहताच चिंपांझीच्या आनंदाला पारावार राहत नाही. तो त्याच्या केयरटेकरकडे धावतो आणि विलंब न करता मिठी मारतो. हा व्हिडिओ पाहून असे वाटते की, तो त्याच्या जुन्या आठवणी ताज्या करत आहे. व्हिडिओमध्ये चिंपांझीचा उत्साह आणि प्रेम इतके स्पष्टपणे दिसून येते की प्रत्येक पाहणाऱ्याच्या हृदयाला स्पर्श करते.

Emotional Chimpanzee Video
Viral Video: तंत्रज्ञानाची कमाल! छप्पर असलेली स्कुटर बनली चर्चेचा विषय, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले, "मला पण हवी..."

दरम्यान, हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडिया (Social Midea) प्लॅटफॉर्म X वर @buitengebieden नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत तो हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले की "वर्षांपूर्वी वाचवलेल्या आणि त्याची काळजी घेणाऱ्या केयरटेकरला पाहून चिंपांझीची ही बोलकी प्रतिक्रिया...."

Emotional Chimpanzee Video
Viral Video: चाचाची जवानी ऑन...! 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर केला जबरदस्त डान्स; यूजर म्हणाले, चाचापुढे कतरिना कैफही फेल

दुसरीकडे, या व्हिडिओवर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या. एकाने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, "प्रेमाचे खरे दर्शन घडले!" दुसऱ्याने लिहिले की, "मानवांनी या चिंपांझींकडून प्रेम शिकले पाहिजे!" तर तिसऱ्याने लिहिले की, "हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझा दिवस सत्कारणी लागला." या व्हिडिओने प्राण्यांमध्येही माणसांइतक्याच ह्रदयस्पर्शी भावना असतात हे दाखवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com