Viral Video: चाचाची जवानी ऑन...! 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर केला जबरदस्त डान्स; यूजर म्हणाले, चाचापुढे कतरिना कैफही फेल

Dancing Uncle Viral Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, रिल्स व्हायरल होतात.
Dancing Uncle Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Dancing Uncle Viral Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, रिल्स व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ "डान्सिंग अंकल" चा आहे! होय, चाचाने बंद रुममध्ये "टिप टिप बरसा पाणी" वर अशा प्रकारे डान्स केला की, नेटिझन्सनाही हासू आवरेना...

आधी हा व्हिडिओ पाहा!

'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर चाचाचा जबरदस्त डान्स

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये चाचा एका बंद रुममध्ये एकटेच "टिप टिप बरसा पानी" गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. जणू ते 90च्या दशकात रवीना टंडनसोबत सेटवर आहेत, असे वाटते. चाचाच्या डान्स मूव्हज अशा आहेत की, कधी ते कंबर हलवतात, कधी हात हलवतात, तर कधी असे वाटते की, ते पावसात भिजल्यानंतर रवीनाच्या पावलांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओमध्ये चाचाचा उत्साह पाहण्यासारखा आहे. कोणीतरी गुपचूप चाचाचा हा "परफॉर्मन्स" रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Midea) तूफान व्हायरल झाला.

Dancing Uncle Viral Video
Viral Video: आत्ता काय खरं नाय...! नवरीनं लग्नात केक खाण्यास नकार दिल्यावर नवरदेवाचा संताप, पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी काकाची खिल्ली उडवली

हा व्हिडिओ @NazneenAkhtar23 नावाच्या एका युजरने सोशल साइट X वर शेअर केला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत तो हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी व्हिडिओवर कमेंटही केली आहे. तर एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, "चाचाच्या या डान्स पुढे कतरिना कैफही फेल." दुसऱ्याने लिहिले की, "चाची घरी नव्हती असे दिसते, म्हणूनच चाचाला संधी मिळाली." तिसऱ्याने चाचाची खिल्ली उडवत लिहिले की, "चाचा, बंद खोलीत इतकी तरुणाई? आता मला तुम्हालाही लग्नाला आमंत्रित करावे लागेल."

तर दुसरीकडे, चाचाचा या वयातील जबरदस्त उत्साह पाहून काही लोक अवाक झाले. ते म्हणाले की, "वय फक्त एक आकडा आहे, चाचाने ते सिद्ध केले!" पण काही ट्रोलर्सनीही संधीचा फायदा घेत लिहिले की, "चाचा, हा डान्स आहे की झुम्बा क्लासचा सराव?" पण ते काहीही असो, चाचाच्या या डान्समुळे सोशल मीडियावर एकच हशा पिकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com