Tamil Nadu: सर्पदंशाने तडफडणाऱ्या कोवळ्या जीवाला अ‍ॅम्ब्युलन्सने मध्येच सोडले, आईच्या कुशीत सोडला जीव; व्हिडिओ

Tamil Nadu Crime: आईने आपल्या मुलाला घेऊन 6 किलोमीटरचे अंतर पार केले, मात्र वाटेतच चिमुकल्याचा मृत्यू झाला.
Mother
MotherDainik Gomantak

Tamil Nadu Crime: माणुसकीला लाजवेल अशी घटना तामिळनाडूतून समोर आली आहे. येथे वेल्लोर जिल्ह्यात 18 महिन्यांच्या चिमुकल्याला साप चावला, त्यानंतर नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरु केली.

दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिकेने त्यांना अर्धवट रस्त्यातच सोडले. त्यानंतर आईने आपल्या मुलाला घेऊन 6 किलोमीटरचे अंतर पार केले, मात्र वाटेतच चिमुकल्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, ही बाब समजल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुसरीकडे, वेल्लोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, एक मिनी रुग्णवाहिका (Ambulance) उपलब्ध होती.

कुटुंबीयांना आशा वर्करकडून प्राथमिक उपचार घेता आले असते. मात्र, पीडित कुटुंबीयांनी आशा वर्करशी संपर्क साधला नाही, त्यांनी मोटारसायकलवर जाण्याचा निर्णय घेतला.

भाजपच्या प्रमुखांनी या घटनेचा निषेध केला

जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भागात रस्ता तयार करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. वनविभागाकडून मंजुरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अन्नीकट्टू पोलिसांनी (Police) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी, तामिळनाडूचे भाजप प्रमुख के अन्नामलाई यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

घटनेला राज्य सरकार जबाबदार - अण्णामलाई

या घटनेसाठी त्यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले. अन्नामलाई म्हणाले की, वेल्लोरची घटना लज्जास्पद आहे. राज्य सरकारने वेळीच रस्ता तयार केला असता तर चिमुकल्याला योग्य वेळी रुग्णालयात पोहोचवता आले असते, असेही ते म्हणाले.

या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वीही, अनेकदा रस्त्याची मागणी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र प्रत्येक वेळी प्रशासन त्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करायचे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com