मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने पोलिसाला सर्वांसमोर मारली थप्पड! अधिकाऱ्यालाही केली शिवीगाळ, पाहा व्हिडिओ...

कारवाईविरोधात ठिय्या
Y S Shamila
Y S Shamila Dainik Gomantak
Published on
Updated on

Y. S. Sharmila slaps cops: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीने चक्क पोलिसाला सर्वांसमोर थप्पड मारल्याची, शिवीगाळ केल्याची तसेच उद्धट भाषेत अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार तेलंगणात घडला आहे.

वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहिण आणि आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या वाय. एस. शर्मिला या वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख आहेत. सोमवारी तेलंगणा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Y S Shamila
Munawar Faruqui Granted Bail: कॉमेडियन मुनव्वर फारूकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिले 'हे' आदेश

राज्य लोकसेवा आयोगाची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी शर्मिला या SIT कार्यालयात जात होत्या. पोलिसांना त्यांना ताब्यात घ्यायचे होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांची गाडी गेटवरच अडवली. या वेळी शर्मिला यांच्या गाडीसमोर एक अधिकारी आणि काही हवालदार उभे राहिले.

तेव्हा शर्मिला यांनी त्यांच्या ड्रायव्हरला वेग वाढवण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी चालकाला गाडीतून बाहेर ओढले.

त्यामुळे शर्मिला संतापल्या. त्या गाडीतून खाली उतरल्या आणि थटे पोलिस अधिकाऱ्याशी भिडल्या. त्यावेळी दोघांत शाब्दिक चकमक झडली. त्यानंतर शर्मिला यांनी तिथे सर्वांसमोरच थेट पोलिस अधिकाऱ्याला थप्पड मारली. अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्यानंतर महिला पोलिसांनी शर्मिला यांना ताब्यात घेतले.

Y S Shamila
Delhi Airport: वर विमानांचे पार्किंग, त्या खालून धावणार कार....दिल्ली विमानतळावर पाहायला मिळणारे अनोखे दृश्य

या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की एक अधिकारी गाडीचा दरवाजा उघडत असताना शर्मिला तिथे पोहचात आणि त्याला धक्काबुक्की करतात. त्यांनी पोलिस अधिकाऱ्याचा हातही धरला. महिला पोलिसांना धक्काबुक्की केली.

मारण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर शर्मिला यांनी कारवाईच्या निषेधार्थ तिथेच जमिनीवर ठिय्या मांडला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्थानकांत आणले आहे.

TSPSC पेपर लीक प्रकरणी कारवाई न झाल्याने शर्मिला संतापल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या विषयावर कोणतीही बैठक घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले होते. दीड महिना उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शर्मिला यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com