देशात आगामी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. यामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. यातच आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोरखपूर शहरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
तसेच, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 57 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वात मोठे नाव आहे ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे. दुसरीकडे, आज दिल्लीत (Delhi) राज्य निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली.
पहिला आणि दुसरा टप्पा जाहीर झाला
भाजपने पहिल्या टप्प्यात 58 जागांपैकी 57 जागांची घोषणा केली, तर दुसऱ्या टप्प्यात 55 पैकी 48 जागा. दुसरीकडे भाजपने पहिल्या यादीत कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह यांनाही तिकीट दिले आहे. याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे पुत्र पंकज सिंह यांनाही मैदानात उतरवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढवणार
याआधी योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र पक्षाने त्यांना गोरखपूर शहरातून तिकीट दिले आहे. खरं तर, अयोध्येच्या माध्यमातून पक्षाला संपूर्ण राज्याला संदेश द्यायचा होता. दरम्यान असेही बोलले जात होते की सीएम योगी यांनी अयोध्येतून निवडणूक लढवल्यास ते जवळपासच्या 60 जागांवर प्रभाव टाकू शकतात.
तथापि, केशव प्रसाद मौर्य हे सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे आधीच मानले जात होते आणि अलीकडेच त्यांच्या जवळच्या मानल्या जाणार्या नेत्याला सिरथू जागेचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यासोबतच आग्रा ग्रामीणमधून बेबी राणी मौर्याला उमेदवारी देण्यात आली आहे. खरं तर यूपी निवडणुकीपूर्वी पक्षाने त्यांना उत्तराखंडच्या राज्यपालपदावरुन हटवून राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्त केले होते. त्याचवेळी आता पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.