'भाजपची राजवट हिटलर अन् स्टॅलिनपेक्षाही वाईट': ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर केल्याचा आरोप केला.
Chief Minister West Bengal Mamata Banerjee
Chief Minister West Bengal Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर केल्याचा आरोप केला. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार देशाची संघीय संरचना नष्ट करत आहे. इथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना बॅनर्जी यांनी दावा केला की, "भाजपची राजवट अ‍ॅडॉल्फ हिटलर, जोसेफ स्टॅलिन किंवा बेनिटो मुसोलिनीपेक्षा वाईट आहे." (Chief Minister West Bengal Mamata Banerjee Says Bjp Rule Worse Than That Of Hitler And Mussolini)

दरम्यान, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय संस्थांना स्वायत्तता दिली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. “भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकार (Central Government) राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर करत आहे. त्यामुळे देशाची संघीय रचना नष्ट होत आहे. तिथे तुघलकी राजवट लागू असल्याचे ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटले.

Chief Minister West Bengal Mamata Banerjee
भाजप-काँग्रेसविरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न; ममता बॅनर्जीं

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुढे म्हणाल्या, "एजन्सींना स्वायत्तता दिली पाहिजे आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निष्पक्षपणे काम करु दिले पाहिजे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com