मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी रवाना; 10 दिवस नॉट रिचेबल

Arvind Kejriwal 2014 च्या लोकसभा निवडणुका आणि 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील केजरीवाल यांनी विपश्यनासाठी वेळ काढला होता.
Chief Minister Arvind Kejriwal went for Vipassana
Chief Minister Arvind Kejriwal went for Vipassana Dainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आजपासून 10 दिवसांसाठी विपश्यना (Meditation) करण्यासाठी गेले आहेत. केजरीवाल यांची ही विपश्यना करायला जाण्याची ही पहिली वेळ नाही. केजरीवाल यापूर्वीही अनेक वेळा विपश्यना ध्यान करण्यासाठी गेले आहेत. केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील इगतपूरी, हिमाचल प्रदेशातील धरमकोटसह अनेक विपश्यना शिबिरांमध्ये 10 दिवसांचे विपश्यना सत्र पुर्ण केले आहे. शिबिरादरम्यान केजरीवाल यांच्याकडे ना टीव्ही असेल आणि ना ते वर्तमानपत्र वाचु शकणार आहेत.

Chief Minister Arvind Kejriwal went for Vipassana
जम्मू-कश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याची शक्यता, देशातील एजन्सीज् हाय अलर्टवर

2014 च्या लोकसभा निवडणुका आणि 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील केजरीवाल यांनी विपश्यनासाठी वेळ काढला होता. आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून विपश्यना करण्यासाठी गेले होते. राजकारणात येण्यापूर्वीच केजरीवाल विपश्यना शिबिरांमध्ये जात होते. त्यांचे सहकारी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील वेगवेगळ्या विपश्यना ध्यान शिबिरांना उपस्थित राहिले आहेत. यासोबतच केजरीवाल निसर्गोपचाराचीही आवड राहिली आहे. केजरीवाल बॅंगलोरच्या निसर्गोपचार केंद्रातही गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com