''थोडं एंटरटेनमेंट आवश्यक आहे...'', CJI चंद्रचूड यांनी चंदीगड महापौर प्रकरणात अशी का टिप्पणी केली?

Supreme Court on Chandigarh Mayor Elections: चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे.
Chief Justice DY Chandrachud
Chief Justice DY ChandrachudDainik Gomantak
Published on
Updated on

Supreme Court on Chandigarh Mayor Elections: चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनीही अतिशय रंजक टिप्पणी केली.

निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांचा बॅलेट पेपरसोबत व्हिडिओ चालवला जात असताना सरन्यायाधीशांची अशीच एक टिप्पणी आली. सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड महापौर निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केले. या ऐतिहासिक निर्णयादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कठोर भाष्य करत गुन्हा घडल्याचे सांगितले.

दरम्यान, चंदीगड महापौर निवडणुकीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु होती. यावेळी जोरदार वादावादीही झाली. सुनावणीदरम्यान, एक व्हिडिओ देखील प्ले करण्यात आला ज्यामध्ये निवडणूक अधिकारी बॅलेट पेपरची तपासणी करताना दिसत आहेत.

जेव्हा हा व्हिडिओ सुरु झाला तेव्हा सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा. प्रत्येकासाठी थोडं एंटरटेनमेंट आवश्यक आहे. संपूर्ण व्हिडिओ पुन्हा प्ले करण्याची गरज नाही, असेही सीजेआय म्हणाले. याचिकाकर्त्याने व्हिडिओचा तो भाग आधीच स्पष्ट केला आहे जो केसशी संबंधित आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हसत हसत म्हणाले की, जर संपूर्ण व्हिडिओ प्ले केला असेल तर आम्हाला संध्याकाळी 5.45 पर्यंत येथे थांबावे लागेल.

Chief Justice DY Chandrachud
Supreme Court: ''22 वर्षे का सहन केले...'', SC मध्ये न्यायाधीश संतापले; राज्य सरकारला ठोठावला 10 लाख रुपयांचा दंड

तत्पूर्वी, सरन्यायाधीशांनी निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांना चांगलचं फैलावर घेतले. अनिल मसिह मतपत्रिकेवर खुणा करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. मसिह यांनी आप उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या आठ मतपत्रिका अवैध ठरवल्या होत्या. त्यामुळे कमी मते पडूनही भाजपचा (BJP) महापौर उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले होते.

आपला निकाल देताना न्यायालयाने टिप्पणी केली की, चंदीगडच्या महापौर निवडणुकीत पीठासीन अधिकाऱ्याने जाणूनबुजून आठ मतपत्रिका खराब करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी, निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांच्याविरुद्ध गैरवर्तणूक केल्याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com