Coal Mining Malpractices: विजय दर्डा यांच्यासह सातजण दोषी

कोळसा खाणवाटप गैरव्यवहार : देवेंद्र दर्डा, गुप्ता यांचा समावेश; शिक्षेवर मंगळवारी सुनावणी
Coal Scam
Coal ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Coal Mining Malpractices छत्तीसगडमधील कोळसा खाणवाटपातील गैरव्यवहार प्रकरणी दिल्ली येथील न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार व ‘लोकमत समूहा’चे अध्यक्ष विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह सात जणांना दोषी ठरविले आहे. या सर्वांच्या शिक्षेवर मंगळवारी (ता. 18) सुनावणी होणार आहे.

कोळसा गैरव्यवहार प्रकरणातील ही 13 वी दोषनिश्‍चिती आहे. विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी आज या प्रकरणाचा निकाल देताना विजय दर्डा यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लिमिटेड ही कंपनी आणि या कंपनीचे संचालक मनोजकुमार जयस्वाल हेदेखील दोषी असल्याचे मान्य केले.

गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या काही तरतुदींच्या अंतर्गत न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले. या सर्वांचा दोष पुराव्यानिशी सिद्ध करण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) यश आले असल्याचा सरकारी वकील ए. पी. सिंह यांनी केलेला युक्तिवाद न्या. बन्सल यांनी मान्य केला.

या प्रकरणाचा तपास बंद करण्याची परवानगी ‘सीबीआय’ने यापूर्वी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून तपासाचे आदेश दिले होते.

Coal Scam
Chandrayaan-3 Mission: ‘चांद्रयान-३’ आज झेपावणार; श्रीहरीकोटा येथून होणार प्रक्षेपण

पत्रातून पंतप्रधानांची दिशाभूल

माजी खासदार दर्डा यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लिहिलेल्या पत्रात दिशाभूल करणारी माहिती सादर केली होती, असे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले होते. डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे त्यावेळी कोळसा खात्याचीही जबाबदारी होती. आज दोषी ठरवलेल्या सर्वांना शिक्षा सुनावण्यासाठी 18 जुलैला सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com