Chenab Bridge: घोडे,खेचरांच्या मदतीने बांधला सर्वांत उंचीवरील रेल्वेपूल; 'चिनाब पूल' बांधताना अनेक अडचणींशी दोन हात

Chenab Railway Bridge: जगातील सर्वांत उंचीवर असलेला चिनाब रेल्वेपूल बांधण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना ‘अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी’ला करावा लागला.
Chenab Railway Bridge News
Chenab Railway BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

कटरा: जगातील सर्वांत उंचीवर असलेला चिनाब रेल्वेपूल बांधण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना ‘अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी’ला करावा लागला. तीव्र चढ-उताराच्या मार्गावरून प्रत्यक्ष साइटवर काम करण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. मात्र, या संपूर्ण प्रकल्पात सामानाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली ती घोडे आणि खेचरांनी.

आफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या आणि मुख्य अडचणींपैकी एक म्हणजे पुलाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उपकरणे आणि बांधकाम साहित्य वाहून नेण्याची सोय करणे होती.

‘‘प्रकल्प पथकाने सुरुवातीला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी खेचर आणि घोड्यांचा वापर केला. हळूहळू कालांतराने तात्पुरते रस्ते तयार करण्यात आले आणि त्या ठिकाणी प्रवेशाची सुविधा उपलब्ध झाली,’’ असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या मार्गावरील हा एक महत्त्वाचा पूल मानला जात आहे.

कंपनीच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, प्रकल्पाच्या अखेरीस नदीच्या उत्तर किनाऱ्यावर ११ किमी लांबीचा रस्ता आणि दक्षिण किनाऱ्यावर १२ किमी लांबीचा रस्ता बांधण्यात आला. आफकॉनचे कार्यकारी उपाध्यक्ष कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी सांगितले की, चिनाब रेल्वे पूल केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार नाही. तो भारताच्या कल्पकतेने आणि धैर्याने सर्वांत कठीण आव्हानांवर मात करण्याच्या निर्धाराचे प्रतीक आहे.

Chenab Railway Bridge News
Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; लेफ्टनंट गव्हर्नरच्या अधिकारात केली वाढ!

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनीने जगातील सर्वात उंच क्रॉसबार केबल क्रेन्स आणि विशेष जड यंत्रसामग्रीचा वापर केला. ‘‘चढ-उताराच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर ग्राउटिंग करून त्यांना विशाल कमानीच्या पाया निर्माण करण्यासाठी मजबूत बनवण्यात आले. अनेक वर्षे त्यासाठी मेहनत घेण्यात आली.

भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच चिनाब पूलाची बांधणी करताना रुळाचा वळणावरील वक्र भाग वाढवित नेणे आणि आणि चढही वाढविणे एकाच बिंदूपासून सुरू केले गेले आहे, असे ‘अफकॉन’चे उपव्यवस्थापकीय संचालक गिरीधर राजगोपालन यांनी सांगितले.

Chenab Railway Bridge News
Narendra Modi: ..मोदी 'त्या' दिवशी रात्रभर जागे होते! केंद्रीयमंत्र्यांनी सांगितली ‘ऑपरेशन सिंदूर’दिवशीची गोष्ट

अफकॉनचे व्यवस्थापकीय संचालक एस. परमेसिवन म्हणाले, ‘‘कंपनीसाठी हा पूल देशाच्या निर्मितीप्रती आमची अबाधित बांधिलकी आणि अत्यंत कठीण भूभागातही पायाभूत सुविधा घडवण्याची आमची क्षमता दर्शवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com