Cheetah Pawan: कुनोच्या पार्कमध्ये चित्ता पवन पुन्हा मोकळ्या जंगलात, पाहा फोटो
Cheetah Pawan: कुनो नॅशनल पार्कच्या परिसरात बंदिस्त असलेल्या पवन या नर चित्ताला दोन महिन्यांनंतर पुन्हा मोकळ्या जंगलात सोडण्यात आले आहे. नामिबियातून आणल्यानंतर पवनला 21 मार्च रोजी जंगलात सोडण्यात आले होते, परंतु त्याने वारंवार कुनोची सीमा ओलांडली. कधी शिवपुरीच्या माधव राष्ट्रीय उद्यानात तर कधी यूपीच्या सीमेवर जाऊन त्याला परत आणले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याला 25 एप्रिलला कोंडून ठेवण्यात आले होते.
कुनोचे डीएफओ पीके वर्मा यांनी सांगितले की, सध्या 10 चित्ते जंगलात आहेत. जंगलात गौरव आणि शौर्य यांच्याशी झालेल्या झटापटीत अग्नि आणि वायु या दोन बिबट्यांना पुन्हा वापस आणण्यात आले आहे. सध्या सात चित्ते आणि एक बछडा आहे. यातील आणखी चार चित्ते जंगलात सोडण्यात येणार आहेत.
कुनो येथे स्थायिक झालेल्या चित्तांच्या सुरक्षेबाबत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे वन अधिकारी मंगळवारी ग्वालिअरमध्ये बैठक घेणार आहेत. खरे तर कुनो पार्कमधून बाहेर पडून यूपी सीमेपर्यंत चिते आल्याने तेथील अधिकारीही या प्रकल्पाशी जोडले जात आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांना चित्त्यांच्या संरक्षणासाठी उपकरणेही देणार आहे. या बैठकीला दोन्ही राज्यांचे मुख्य वन्यजीव वॉर्डन, एनटीसीएचे सदस्य सचिव एसपी यादव आणि अनेक बडे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या चित्ता पुनर्स्थापन या प्रकल्पाअंतर्गत भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा भारतात पुनरुज्जीवित करण्यासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका येथून 20 चित्ते आणले होते. सर्वात पहिले नामिबियातून 17 सप्टेंबर रोजी 8 चित्ते आणण्यात आले. त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले. त्यांना देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.