Chandigarh Mayor Elections: माजी रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली

Chandigarh Mayor Elections: चंदीगड महापौर निवडणुकीत हेराफेरीचा आरोप असलेले माजी अधिकारी अनिल मसिह यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.
Anil Masih
Anil Masih Dainik Gomantak
Published on
Updated on

Chandigarh Mayor Elections: चंदीगड महापौर निवडणुकीत हेराफेरीचा आरोप असलेले माजी अधिकारी अनिल मसिह यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. 30 जानेवारी 2024 रोजी चंदीगड येथे झालेल्या महापौर निवडणुकीत 8 मते अवैध ठरवल्याप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान त्यांनी माफी मागितली. फेब्रुवारीमध्ये यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने माजी निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. त्यांनी जाणूनबुजून मते अवैध ठरवल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

दरम्यान, अनिल मसिह यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली आहे. या प्रकरणात आपली चूक झाल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. चंदीगडच्या भाजप महापौर निवडीचा निर्णय न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला. आम्ही बिनशर्त माफी मागितल्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले. आता अनिल मसिह आपले जुने प्रतिज्ञापत्र मागे घेणार असून दुसरे प्रतिज्ञापत्र देऊन बिनशर्त माफी मागणार आहेत. ज्येष्ठ वकील सिंघवी म्हणाले की, त्यांनी बिनशर्त माफी मागितल्यास त्यांना कोणतीही अडचण नाही.

Anil Masih
Supreme Court: ''मी व्हिस्कीचा फॅन आहे'', SC मध्ये CJI चंद्रचूड आणि ज्येष्ठ वकील यांच्यात रंजक संवाद

अनिल मसिह यांनी माफी मागितली

नोटीसला उत्तर देताना, निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी यापूर्वी न्यायालयात उत्तर दिले होते की, जेव्हा ते अखेरचे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अनिल मसिह यांनी आठ मते रद्द केल्याच्या प्रकरणानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. याबाबत आम आदमी पक्षाने भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता आणि नंतर न्यायालयाने ही मतमोजणी बेकायदेशीर ठरवली होती.

Anil Masih
Supreme Court: मिस्टर ॲटर्नी जनरल, तुमचे राज्यपाल काय करतायेत? CJI चंद्रचूड संतापले; दिला कडक इशारा

जाणून घ्या काय होतं प्रकरण

दरम्यान, 30 जानेवारी रोजी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला एकूण 16 मते मिळाली होती, ज्यामध्ये भाजपचे 14 नगरसेवक, अकाली दलाचा एक नगरसेवक आणि एका खासदाराचा समावेश होता. तर इंडिया अलायन्सला 20 मते मिळाली होती, ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे 13 आणि काँग्रेसचे 7 नगरसेवक होते. मात्र निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी युतीची आठ मते अवैध ठरवली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावर निवडणूक अधिकारी स्वत: कॅमेऱ्यासमोर मतांचे मार्किंग करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com