लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वापरणाऱ्यांसाठी मोठा धोका, सरकारने दिला इशारा; ताबडतोब सतर्क व्हा!

Windows 10 And 11: अशा परिस्थितीत जर तुम्ही विंडोज 10, विंडोज 11 किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरत असाल तर तुम्हाला ताबडतोब सतर्क होण्याची गरज आहे.
Cyber ​​Hacking
Cyber ​​HackingDainik Gomantak

Windows 10 And 11: कॉम्प्युटर आणि लॅपटॉप युजर्ससाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही विंडोज 10, विंडोज 11 किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरत असाल तर तुम्हाला ताबडतोब सतर्क होण्याची गरज आहे. CERT-In (Indian Computer Emergency Response Team) ने युजर्संना एक अलर्ट जारी केला आहे की, मायक्रोसॉफ्ट विंडोज प्रोडक्ट्सना सिक्युरिटी बायपास म्हणजेच एक प्रकारचा हॅकिंगचा धोका आहे. या धोक्यामुळे हॅकर्स युजर्सच्या लॅपटॉप किंवा पीसीवर सहज ताबा मिळवू शकतात. CERT-In ने हा धोका अत्यंत गंभीर म्हणजेच गंभीर श्रेणीत ठेवला आहे.

अशा प्रकारे मालवेअर सिस्टमपर्यंत पोहोचतो

CERT-In च्या मते, Microsoft Windows मधील या धोक्याचे कारण म्हणजे प्रॉक्सी ड्रायव्हरमध्ये चुकीचे ऐक्सेस रिस्ट्रिक्शन आणि MoW (Mark of the Web) चा अयोग्य वापर. असे सांगितले जात आहे की, स्मार्टस्क्रीन सिक्युरिटी फीचर प्रोटेक्शन सिस्टम मार्क ऑफ द वेब फीचरला बायपास करुन टार्गेट सिस्टममध्ये मालवेअर इन्स्टॉल करते. मालवेअर इन्स्टॉल करण्यासाठी, हॅकर्स युजर्सच्या सिस्टमला खास रिक्वेस्ट सेंड करतात.

Cyber ​​Hacking
''दहशतवाद्यांना मारण्यासाठी कोणताही नियम नाही, संधी मिळेल तिथे...''; परराष्ट्र जयशंकर स्पष्टच बोलले

या प्रोडक्ट्सवर धोका

सीईआरटी-इन नुसार, हॅकिंगचा धोका असलेल्या मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट्समध्ये विंडोज, ऑफिस, डेव्हलपर टूल्स, अझूर, ब्राउझर, सिस्टम सेंटर, मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स आणि एक्सचेंज सर्व्हर यांचा समावेश आहे. सुरक्षा एजन्सीने युजर्संना कंपनीच्या अपडेट गाइडमध्ये नमूद केलेली सिक्युरिटी अपडेट्स इन्स्टॉल करण्यास सांगितले आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही CERT-In ने Windows 10 आणि 11 युजर्ससाठी एक चेतावणी जारी केली होती. ही चेतावणी मायक्रोसॉफ्ट विंडोज कर्नलशी जोडलेली होती. याद्वारे हॅकर्स युजर्सच्या सिस्टमला टार्गेट करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com