निवडणुक हंगामानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा झळकणार लसीकरण प्रमाणपत्रावर

या राज्यांमध्ये पुन्हा कोविड-19 लसीकरण (Covid Vaccination Certificate) प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो प्रकाशित करण्याची योजना आखली आहे.
Covid Vaccination Certificate
Covid Vaccination CertificateDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा हंगाम संपल्यानंतर केंद्राने या राज्यांमध्ये पुन्हा कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रांवर (Covid Vaccination Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Prime Minister Narendra Modi) फोटो प्रकाशित करण्याची योजना आखली आहे. 8 जानेवारी रोजी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर- उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गोवा (Goa), उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांमधील लसीकरण (Vaccination) प्रमाणपत्रावरुन मोदींचा फोटो हटवण्यात आला होता. (Center plans to resume printing of PM's photo on covid vaccination certificate after elections in 5 states)

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी या राज्यांमध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्रांवर पंतप्रधानांच्या फोटोची छपाई सर्वोच्च प्राधान्याने पुन्हा सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Covid Vaccination Certificate
20 लाख नोकऱ्या देण्याचे 'आप'चे आश्वासन; दिल्लीचा अर्थसंकल्प सादर

“या पाच राज्यांतील लोकांना देण्यात येणाऱ्या कोविड-19 प्रमाणपत्रांमध्ये पंतप्रधानांचा फोटो समाविष्ट करण्यासाठी को-विन प्लॅटफॉर्मवर आवश्यक बदल केले जातील,” असेही सूत्रांकडून पीटीआय वृत्तसंस्थेला सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com