'सीबीआयच्या निष्क्रियतेमुळे विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित होतात'

केंद्रीय तपास यंत्रणांकडून (Central Investigation Mechanisms) करण्यात असलेल्या कारवाया राजकीय पुरस्कृत आहेत, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
CJI NV Ramana
CJI NV RamanaDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात असलेल्या कारवाया राजकीय पुरस्कृत आहेत, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. याच पाश्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमणा (CJI NV Ramana) यांनी विविध प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ची कारवाई आणि निष्क्रियता याविषयी म्हटले आहे की, तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. अनेकदा पोलिस अधिकारी आमच्याकडे येतात आणि त्यांना त्रास दिला जात असल्याचे सांगतात... असेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले. राजकीय प्रतिनिधी बदलत राहतात, पण तुम्ही नेहमीच तिथे असाल. "लोकशाही: तपास यंत्रणांची भूमिका आणि जबाबदारी" या विषयावरील व्याख्यानाला संबोधित करताना सरन्यायाधीशांनी सांगितले की, ब्रिटीश राजवटीपासून भारतातील पोलिस यंत्रणा टप्प्याटप्प्याने बदलत गेली.

'तपास यंत्रणांना स्वतंत्र, स्वायत्त बनवणे ही काळाची गरज आहे,' असे सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले. एकाच ''गुन्ह्याचा तपास अनेक एजन्सींकडून केल्याने त्रास होतो. गुन्हा दाखल झाला की, त्याचा तपास कोणती एजन्सी करणार हे ठरवावे. आजकाल एकाच प्रकरणाची अनेक एजन्सीद्वारे चौकशी केली जाते. यामुळे संस्थेला छळवणुकीचे साधन म्हणून दोष देण्यापासून वाचवले जाईल. अहवाल आल्यानंतर कोणत्या एजन्सीने तपास हाती घ्यायचा हे संस्थेने ठरवावे,'' असेही सरन्यायाधीस म्हणाले. सरन्यायाधीश पुढे म्हणाले, 'जेव्हा तुम्ही नतमस्तक होणार नाही तेव्हा तुम्ही शौर्यासाठी ओळखले जाल.'

CJI NV Ramana
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

सरन्यायाधीश पुढे म्हणाले, ''पोलीस हे फक्त काम नसून कॉलिंग आहे. ब्रिटीशांनी भारतात कायदा आणण्याबरोबर रॉयल पोलिस तयार केले होते. जे भारतीय नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी डिझाइन केले गेले होते. परंतु सत्ताधारी नेत्यांकडून पोलिसांचा गैरवापर करणे ही नवीन बाब नाही. पोलिसांवर सामान्यतः कायद्याचे राज्य राखण्याचे काम असते. आणि विशेष म्हणजे ते न्याय वितरण प्रणालीचा अविभाज्य भाग असतात. पोलिसांना पूर्ण स्वायत्तता द्यावी, ही आग्रहाची मागणी आहे. सर्व संस्थांनी लोकशाही मूल्यांचे पालन आणि बळकटीकरण केले पाहिजे. कोणत्याही हुकूमशाही प्रवृत्तींना वाढू देऊ नये. न्यायपालिकेच्या निःपक्षपातीपणामुळे तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याच्या विनंत्यांचा पूर आला आहे. परंतु कालांतराने इतर संस्थांप्रमाणेच सीबीआयचीही कठोर तपासणी झाली पाहिजे.''

CJI NV Ramana
भाजप खासदार गौतम गंभीर यांना ISIS कडून जीवे मारण्याची धमकी

CJI पुढे म्हणाले, ''भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. अनेकदा पोलिस अधिकारी आमच्याकडे येतात आणि सरकार बदलल्याने त्रास होत असल्याची तक्रार करतात. परंतु तुम्ही हे लक्षात ठेवावे की, लोकप्रतिनिधी काळाबरोबर बदलत राहतात, पण तुम्ही कायमस्वरुपी आहात. कोणतीही संस्था आपल्या नेतृत्वाप्रमाणे चांगली किंवा वाईट असू शकते, परंतु काही अधिकारी मोठा बदल घडवून आणू शकतात.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com