Rear Seat Belt Alarm: कारमधील रिअर सीट बेल्ट अलार्म आता अनिवार्य, अन्यथा बसेल हजारोंचा दंड! कधीपासून होणार अंमलबजावणी?

Rear Seat Belt Alarm: जर मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने बेल्ट घातला नसेल तर लवकरच कारमध्ये अलार्म वाजला जाईल.
Car Seat Belt
Car Seat BeltDainik Gomantak

car care Rear Seat Belt Alarm in Mandatory know about date fine

जर कारमधील मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने बेल्ट लावला नसेल तर लवकरच कारमध्ये अलार्म वाजला जाईल. कारण, 1 एप्रिल 2025 पासून देशात विकल्या जाणाऱ्या सर्व कारमध्ये 'रिअर सीट बेल्ट अलार्म' लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी वाहन उत्पादक कंपन्यांना एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे.

सीट बेल्ट अलार्म एक गरजेचे फिचर आहे. हे सेफ्टी फीचर कारमध्ये बसलेल्या प्रवाशाला सीट बेल्ट लावण्यासाठी बीपिंग आवाजाने अलर्ट करते आणि जोपर्यंत प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही तोपर्यंत हा आवाज थांबत नाही.

एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही अधिसूचना फक्त मागील सीट बेल्टच्या अलार्मसाठी आहे, याशिवाय इतर कोणतीही नवीन तरतूद करण्यात आलेली नाही.

नियम मोडल्यास 1000 रुपये दंड

सध्या, अंगभूत सीट बेल्ट स्मरणपत्रे ड्रायव्हर आणि पुढच्या सीटच्या प्रवाशांसाठी अनिवार्य आहेत. सीट बेल्ट न लावणाऱ्या मागील सीटच्या प्रवाशांना केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 138 (3) अंतर्गत 1,000 रुपये दंड आकारला जातो, परंतु बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नसते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ट्रॅफिक पोलिसही क्वचितच काही प्रवाशांकडून सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंड आकारतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कार अपघातानंतर प्रवाशांची सुरक्षितता सुधारण्यासाठी या निर्णयाचा उद्देश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com