Justice Abhijit Gangopadhyay: न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा, 7 मार्चला भाजपमध्ये प्रवेश; तामलूकमधून लढवणार निवडणूक

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरात सुरु केली आहे.
Justice Abhijit Gangopadhyay
Justice Abhijit GangopadhyayDainik Gomantak

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरात सुरु केली आहे. भाजपने नुकतीच आपली उमेदपवारांची पहिली यादी जाहीर केली. सत्ताधारी मोदी सरकारने अनेक जुन्या चेहऱ्यासंह अनेक नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच मागील काही दिवसांपासून कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत होते. यातच आता, न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा पत्र पाठवले असून त्याची एक प्रत देशाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टीएस शिवगनम यांना पाठवण्यात आली आहे. ते गुरुवारी म्हणजेच 7 मार्च रोजी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर कोलकाता येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, 7 मार्च रोजी दुपारी एक संभाव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करतील.

Justice Abhijit Gangopadhyay
Lok Sabha Election 2024: मतपत्रिकेद्वारे निवडणूका घ्या! पणजीत EVM विरोधी आंदोलन; परिसरात तणावाचे वातावरण

न्यायमूर्ती गंगोपाध्याय मंगळवारी सकाळी उच्च न्यायालयात त्यांच्या चेंबरमध्ये पोहोचले, त्यानंतर त्यांच्या वतीने राजीनामा पत्र पाठवण्यात आले. न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी रविवारी जाहीर केले होते की, ते 5 मार्च रोजी (कोलकाता उच्च न्यायालयाचे) न्यायाधीश पदाचा राजीनामा देणार आहेत. न्यायमूर्ती गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील (West Bengal) शिक्षक भरती घोटाळ्याच्या सुनावणीशी संबंधित होते. ते यावर्षी ऑगस्ट 2024 मध्ये निवृत्त होणार होते. राजीनामा जाहीर करताना त्यांनी पश्चिम बंगालमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन राज्यातील सत्ताधारी टीएमसीवरही हल्ला चढवला होता.

Justice Abhijit Gangopadhyay
Lok Sabha Elections 2024: ''आम्ही ममता बॅनर्जीकडे भीक मागितली नाही'', पश्चिम बंगालमध्ये 2 जागांची ऑफर केल्याने अधीर रंजन चौधरी भडकले

दरम्यान, न्यायमूर्ती गंगोपाध्याय पश्चिम बंगालमधील तामलूक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ आहे. तामलूक ही जागा अलीकडच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 2009 पासून ही जागा टीएमसी सातत्याने जिंकत आहे.

दुसरीकडे, बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथून विजय मिळवला होता. अधिकारी तेव्हा टीएमसीचे नेते होते. टीएमसी सोडल्यानंतरही 2016 च्या पोटनिवडणुकीत टीएमसीचा उमेदवार येथून विजयी झाला. 2009 ते 2016 या काळात सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे उजवे हात असल्याचे बोलले जात होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com