उत्तर प्रदेश निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीचा (बसपा) दारुण पराभव झाला आहे. कधीकाळी राजेशाही थाटात वावरणारा बसपाचा हत्ती आज पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे. बसपाला उत्तर प्रदेश निवडणुकीत एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना बसपा नेत्या मायावती म्हणाल्या, भाजपला रोखण्यासाठी मुस्लिमांनी समाजवादी पक्षाला (सपा) मतदान केले. याचा मोठा फटका बसपाला बसला आहे. यावेळेस त्यांनी सपावर निशाणा साधला. मायावती म्हणाल्या, सपा आपल्या 'जंगलराजसाठी' ओळखला जातो. जंगलराजच्या विरोधात असलेल्या लोकांनी सपाकडे पाठ फिरवली आहे.
आगामी काळात बसपा आपली रणनीती बदलणार आहे. आम्हीच भाजपला (BJP) पर्याय आहोत. पुढील निवडणुकीत बसपा सत्तेत परतेल, असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) निवडणुकीत भाजपने सपा आणि बसपाला मागे टाकत परत एकदा सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.