BSF Soldiers Attcak: भारत-बांगलादेश सीमेवर तस्करांचा उच्छाद! जमावाकडून बीएसएफ जवानांवर जीवघेणा हल्ला; 3 जखमी, 8 अटकेत VIDEO

BSF Soldiers Attacked India Bangladesh Border: भारत-बांगलादेश सीमेवर त्रिपुरातील सिपाहीजला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांवर एका संतप्त जमावाने जीवघेणा आणि हिंसक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
BSF Soldiers Attacked India Bangladesh Border
BSF Soldiers Attacked India Bangladesh BorderDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

BSF Soldiers Attcak Video: भारत-बांगलादेश सीमेवर त्रिपुरातील सिपाहीजला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांवर एका संतप्त जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या भीषण हल्ल्यात बीएसएफचे तीन जवान गंभीररीत्या जखमी झाले. एका संशयित तस्कराला ताब्यात घेतल्यानंतर चिडलेल्या स्थानिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन जवानांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जवानांची डोकी फुटली असून त्यांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.

पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करत आठ हल्लेखोरांना अटक केली असून, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या हिंसक घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना सोमवारी आशाबाडी सीमा चौकीजवळ घडली. एका संशयित तस्कराला बीएसएफने ताब्यात घेतले असता, जमावाने जवानांना घेरले आणि त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

BSF Soldiers Attacked India Bangladesh Border
Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

त्रिपुरात बीएसएफ जवानांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये दुर्गापूर गावात तस्करी रोखताना जमावाने केलेल्या हल्ल्यात 3 जवान जखमी झाले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये बिशालगड येथे पशुतस्करांना अडवल्याने झालेल्या दगडफेकीत 5 जवान गंभीर जखमी झाले होते.

BSF Soldiers Attacked India Bangladesh Border
Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

मुख्यमंत्री माणिक साहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची गंभीर दखल घेत कडक इशारा दिला. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलांवर अशा प्रकारे हल्ले करणे पूर्णपणे अमान्य आणि सहनशीलतेच्या बाहेर आहे, असे स्पष्ट करत त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईचे संकेत दिले. त्याचवेळी, पोलिसांनी कलामचौरा पोलीस ठाण्यात काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. सीमेवरील तस्करीच्या वाढत्या नेटवर्कमुळे आणि अशा हिंसक हल्ल्यांमुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.