'एक हजारो मे नाही तर पहिलीच बहना', रुसलेल्या भावाला लिहिलं 434 मीटर लांब पत्र

पत्रास कारण की...,भावाने बहिणीला केले व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, म्हणून लिहिलं बिल पेपरवर पत्र
Krishna Priya Writer 434-M-Long Letter
Krishna Priya Writer 434-M-Long LetterTwitter
Published on
Updated on

भाऊ-बहिणीत भांडणे होत असतात. पण केरळमधील एका भावाला आपल्या बहिणीचा इतका राग आला की त्याने तिला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले. बहिणीला हा प्रकार कळताच तिने आपल्या 21 वर्षीय भावाची समजूत काढण्यासाठी असे कृत्य केले की हे प्रकरण चर्चेचा विषय बनले. हे प्रकरण केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील आहे. येथे राहणाऱ्या कृष्णप्रिया नावाच्या मुलिने तिच्या धाकट्या भावाची माफी मागण्यासाठी सुमारे 5 किलोग्रॅम वजनाच्या बिलिंग रोलवर 434 मीटर लांब पत्र लिहिले. कृष्णप्रियाचा दावा आहे की, हे पत्र लिहिण्यासाठी तिला 12 तास लागले आहेत. (Krishna Priya Writer 434-M-Long Letter)

'ब्रदर्स डे'च्या शुभेच्छा द्यायला विसरली

कृष्णप्रियाच्या म्हणण्यानुसार, ती यावर्षी 'आंतरराष्ट्रीय ब्रदर्स डे'च्या दिवशी तिच्या छोट्या भावाला म्हणजे कृष्ण प्रसादला शुभेच्छा देण्यास विसरली. कदाचित याचा राग आल्याने त्याने त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले. यानंतर तिने आपल्या भावाला एक लांब पत्र लिहिले. युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरमच्या मते, कृष्णप्रिया यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे पत्र लिहिले आहे.

Krishna Priya Writer 434-M-Long Letter
पत्नीचा वाढदिवस साजरा करून पत्नी अन् मुलांची चार्जरने गळा आवळून हत्या, स्वत: जीव दिला

ब्रदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या नाहीत

कृष्णप्रसादने बहिणीला काही संदेश पाठवले होते. तिने त्याकडे लक्ष दिले नाही. नंतर, इतरांनी तिला ब्रदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या हे कळवण्यासाठी त्याने काही स्क्रीनशॉट देखील पाठवले. जेव्हा बहिणीने त्याच्या संदेशांना उत्तर दिले नाही किंवा ब्रदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तेव्हा त्याने तिला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले.

आमचं नातं एका आई-मुलाचं आहे

मी तिला शुभेच्छा द्यायला विसरले. सहसा 'ब्रदर्स डे'ला मी त्याला फोन करायचे किंवा अभिनंदन करण्यासाठी मेसेज पाठवत असे. पण या वर्षी माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी त्याला शुभेच्छा द्यायला विसरली. माझ्या लक्षात आले की त्याने मला इतरांच्या शुभेच्छांचे स्क्रीनशॉट पाठवले आहेत. आमचं नातं एका आई-मुलाचं आहे. मी त्याला शुभेच्छा दिल्या नाही म्हणून, त्याने माझ्याशी बोलणे बंद केले याचे मला वाईट वाटले. एवढेच नाही तर मला व्हॉट्सअॅपवर ब्लॉकही केले, असे दू:ख कृष्णप्रियाने व्यक्त केले आणि आपली चूक कबूल केली.

15 रोल पेपरमध्ये लिहिली मनातली खंत

ती याप्रसंगामुळे एवढी भावून झाली की तिने, 25 मे रोजी त्याला पत्र लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने लिहिण्यासाठी A4 आकाराचा कागद घेतला. पण आपल्या भावनांपुढे पेपर कमी पडणार हे लवकरच तिच्या लक्षात आले. एकही लांबलचक कागद न मिळाल्याने शेवटी तिने बिलिंग रोलवरच पत्र लिहायला सुरुवात केली. ने 15 रोल विकत घेतले आणि त्यावर मनातील सर्व भाव व्यक्त केले, ज्यासाठी तिला 12 तास लागले.

आतापर्यंतचे सर्वात मोठे पत्र!

पत्र पॅक करणे तिच्यासाठी जिकिरीचे काम होते. कारण प्रत्येक रोलची लांबी सुमारे 30 मीटर होती. अशा स्थितीत तिने ते पत्र कसेतरी एका पेटीत भरले. पोस्ट ऑफिसने 5.27 किलो वजनाचा बॉक्सही कोणत्याही अडचणीशिवाय पोस्ट केला. तिचा भाऊ कृष्णप्रसादला दोन दिवसांनी हे पत्र मिळाले तेव्हा त्यांला बॉक्स बघून वाढदिवसाची भेट आहे असे वाटले. कृष्णप्रियाने यापूर्वीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केला आहे. कारण तिला वाटते की तिने लिहिलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पत्र आहे.

Krishna Priya Writer 434-M-Long Letter
Nupur Sharma Case: नुपूर शर्माने टीव्हीवर देशाची माफी मागावी- सुप्रिम कोर्ट

ब्रदर्स डे कधी साजरा केला जातो?

ब्रदर्स डे दरवर्षी 24 मे रोजी साजरा केला जातो. अमेरिकेत हा दिवस नॅशनल ब्रदर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व बांधवांनी जे काही केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले जातात. हा दिवस त्या सर्व भावांना समर्पित आहे जे आपल्या भावंडांची बहिणींची पालकांप्रमाणे काळजी घेतात आणि त्यांना नेहमी मित्राप्रमाणे साथ देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com