Sitamadhi Groom Died
Sitamadhi Groom DiedDainik Gomantak

Sitamadhi Groom Died: वारंवार सांगुनही वराचे कुणी ऐकेना; ऐन लग्नात स्टेजवरच हार्टअ‍ॅटॅकने मृत्यू, 'हे' आहे कारण...

बिहारच्या सीतामढीमढीमधील घटना
Published on

Sitamadhi Groom Died: बिहारमधील सीतामढी येथे एका लग्नात लग्न सुरू असताना वराचा स्टेजवरच हार्टअ‍ॅटॅकमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृत्यूचे कारण डीजे असल्याचे मानले जात आहे.

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबात तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.

Sitamadhi Groom Died
Bird Flu Crisis: होळीपूर्वी हाहाकार! झारखंडमध्ये बर्ड फ्लूची दस्तक, सरकारकडून अलर्ट जारी

बुधवारी 2 मार्च रोजी रात्री हा प्रकार घडला. सोनबरसा ब्लॉकच्या इंदरवा गावात लग्नाची मिरवणूक आली होती. सीतामढीतील सोनबरसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदरवा गावात हा विवाह सोहळा सुरू होता. महिला गाणी म्हणत होत्या.

मंचावर पुष्पहार घालण्यात आला. फोटो काढले. आणि अचानक वर बेशुद्ध पडला. लोकांनी त्याला तातडीने स्थानिक खासगी डॉक्टरांकडे नेले. येथे तपासाअंती वराला मृत घोषित करण्यात आले.

परिहार ब्लॉकच्या धन्हा पंचायतीच्या मनीथर गावातून ही मिरवणूक आली होती. सुरेंद्र कुमार असे वराचे नाव आहे. त्याच्या आई-वडिलांचे आधीच निधन झाले आहे. तीन भावांमध्ये तो सर्वात लहान होता. तो नुकताच रेल्वेची ग्रुप-डी परीक्षा पास केली होती.

Sitamadhi Groom Died
Modi Govt ने दिली मोठी भेट! आता जेईई मेन अन् इतर स्पर्धा परीक्षांचे कोचिंग मिळणार मोफत

लग्नाच्या वरातीवेळी मिरवणुकीदरम्यान सुरेंद्र (वर) हा वारंवार डीजेचा आवाज कमी करा किंवा डीजे काही अंतरावर ठेवा असे सांगत होते, परंतु कोणीही त्याचे ऐकले नाही. वरमाला घालायच्या वेळीही त्याने डीजे वेगळा लावण्यास सांगितले.

पण पुन्हा त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लोक डीजेच्या तालावर नाचत राहिले. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सुरेंद्रला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com