Bride Weird Condition With Husband On Wedding Night: पती-पत्नीमधील प्रेमसंबंध बिघडवणारी घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आली आहे. येथे पत्नीच्या कृत्याने नाराज झालेल्या तरुणाने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या तरुणाने सांगितले की, पहिले लग्न मोडल्यानंतर वैवाहिक सुखाच्या शोधात त्याने दुसरे लग्न केले. ज्याने त्याचे जीवन नरक बनवले.
लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याच्या दुसऱ्या पत्नीने त्याचा छळ सुरु केल्याचा आरोप या तरुण डॉक्टराने केला आहे. लग्नाच्या रात्रीच बायकोने 50 लाख रुपयांची मागणी केली.
पोलिसांना (Police) दिलेल्या तक्रारीत डॉक्टराने सांगितले की, 2019 मध्ये त्याचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर मुलीची जबाबदारी त्याच्यावर आली. आपले वैवाहिक जीवन पुन्हा सुरु करण्यासाठी, त्याने ऑनलाइन वेबसाइट्सवर जीवन साथीदाराचा शोध सुरु केला.
यावेळी त्याची वेबसाइटवर गाझियाबादमधील एका महिलेशी ओळख झाली. दुसरीकडे, महिलेने सांगितले की, ती एक शिक्षिका आणि वकील आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये लग्नाबद्दल बोलण्यासाठी डॉक्टर महाशय गाझियाबादला गेले होते. येथे महिलेच्या कुटुंबीयांनी लग्नाची सर्व कागदपत्रे आधीच तयार करुन ठेवली होती.
महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरवर लग्नासाठी दबाव टाकला. लग्नानंतर महिला डॉक्टरसोबत त्याच्या घरी आली. महिलेने पहिल्यांदा डॉक्टरकडून त्याचे घर, कुटुंब आणि संपत्तीची संपूर्ण माहिती घेतली.
यानंतर, लग्नाच्या (Marriage) रात्री पहिल्या रात्री तिने त्याला मुलीच्या नावावरील 50 लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यावर डॉक्टरने नकार दिल्याने तिने त्याचा छळ सुरु केला. एवढ्यावरच न थांबता तिने डॉक्टरच्या मुलीच्या जेवणात स्लो पॉयझन देण्यास सुरुवात केली, त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
दरम्यान, डॉक्टरने त्याच्या दुसऱ्या पत्नीवर घरातील सर्व दागिने, 2 लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतल्याचा आरोप केला आहे.
याशिवाय, ती 16 ऑक्टोबर रोजी पुन्हा आली आणि तिने रुग्णालयाचे कुलूप तोडले. डेबिट कार्ड, पासबुक, चेकबुक, रिसर्च पेपर आणि इतर फॉर्म घेऊन निघून गेली.
डॉक्टरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.