Viral Video: सोशल मीडियावर तुम्ही डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकजण साडी नेसून आकर्षक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतात. दरम्यान एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
साडी घालून एखाद्या मुलाने डान्स केला तर तुम्हाला कसे वाटेल. चक्क या मुलाने 'टीप-टीप बरसा पानी' गाण्यावर साडी घालून डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये रवीना टंडनच्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर साडी घालून एक मुलगा डान्स करत आहे. त्याचा हा डान्स अनेकांना आवडला असला तरी काही लोक त्याला ट्रोलही करत आहेत.
मात्र ते काहीही असो, सध्या त्याचा हा डान्स सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ बिनदिक्कतपणे शेअर करत आहेत. चला तर मग हा व्हिडिओ पाहूया.
व्हिडिओमध्ये तो चक्क रविना टंडनसारखा डान्स करताना दिसत आहे. मुलींप्रमाणेच तोही लालित्य दाखवत आहे. मुलाने स्लीव्हलेस ब्लाउज आणि पिवळी साडी नेसलेली आहे आणि पावसात नाचत आहे. व्हिडिओतील मुलाचा डान्स पाहून तो कोणत्याही मुलीपेक्षा कमी आहे असे कोणीही म्हणू शकत नाही.
इन्स्टाग्रामवर (Instagram) धुमाकूळ घालणारा हा व्हिडिओ @amit_the_shinning_star नावाच्या युजरने शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने लिहिले - भाऊ, त्याने खरोखरच पाणी पेटवले आहे. दुसर्याने लिहिले - भावाने कतरिना कैफला तिच्या डान्सने मागे सोडले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.