देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे यातच नेहमीच आपल्या विधानावरुन चर्चेत असणाऱ्या भाजपच्या भोपाळमधील (Bhopal) खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Thakur) यांनी पुन्हा एकदा आपल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कोरोनामुळे फुफ्फसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असे भाजपच्या (Bjp) खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे. गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपले स्वत:चे उदाहरण देत आपण रोज गोमूत्र पित असल्यामुळे कोरोना झाला नसल्याचे सांगितले. एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Boon for cow urine corona MP Pragya Thakur)
प्रज्ञा ठाकूर यांनी व्हिडिओमध्ये गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नसल्याचे म्हटले आहे. ''देशी गाईचे गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग होत नाही. मला खूप त्रास होतो. परंतु मी रोज गोमूत्र पिते. यामुळेच कोरोनासाठी कोणतेही औषधे घ्यायची गरज लागत नाही. मला कोरोना झाली नाही गोमूत्र हे आपल्यासाठी जीवनदान असल्याचे प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले.''
प्रज्ञा ठाकूर रविवारी बैरागढ येथील एका कार्यक्रमामध्ये ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या उद्धटनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केले. तसेच आपण आजारी असल्याने लोकांची मदत घरुनच करत आहोत, असंही त्यांनी सांगितले. साध्वी यांनी दोन वर्षापूर्वी गोमूत्रामुळेच आपल्याला झालेला कर्करोग बरा झाला असल्याचा दावा केला होता. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना डिसेंबर 2020 मध्ये कोरोनाची लक्षण जाणवल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान,इंडियन मेडिकल असोसिएशनने गोमूत्र किंवा शेणाचा उपयोग होत असल्याचा कोणत्याही स्वरुपाचा वैज्ञानिक पुरावा नसल्याचे म्हटले होते. डॉक्टरांनी देखील अशा अपारंपारिक पर्यायी उपचार करण्याच्यासंदर्भात इशारा दिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.