Kempegowda International Airport: बंगळुरुतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी, परिसरात घबराट

Kempegowda International Airport: मेसेजनंतर सरक्षा दलांना सतर्क करण्यात आले. सीआयएसएफच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सर्च ऑपरेशन राबवले.
Kempegowda International Airport
Kempegowda International AirportDainik Gomantak

Kempegowda International Airport: बंगळुरुमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्वच्छतागृहातील आरशावर लिहिण्यात आलेल्या मेसेजने एकच खळबळ उडाली. मेसेजमध्ये बॉम्ब धोक्याचा इशारा देण्यात आला. अल्फा 3 इमारतीमधील स्वच्छतागृहातील आरशावर ही धमकी लिहिण्यात आली आहे. सध्या प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 25 मिनिटांत विमानतळ व्यवस्थापन आणि कर्मचारी कार्यालयांना लक्ष्य करुन स्फोट होण्याची चेतावणी देण्यात आली. या मेसेजनंतर सरक्षा दलांना सतर्क करण्यात आले. सीआयएसएफच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सर्च ऑपरेशन राबवले.

विमानतळावर बॉम्ब टाकण्याची धमकी ही अफवा ठरली

सीआयएसएफ आणि श्वानपथक पथकाने बराच वेळ विमानतळावर बॉम्बचा शोध घेतला मात्र काहीही सापडले नाही. अशा स्थितीत बॉम्बची अफवा पसरवून प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न काही बदमाशांनी केल्याचे पथकाला समजले. या बनावट धमकीच्या मेसेजबाबत असे म्हटले जात आहे की, ही विमानतळावरील कर्मचाऱ्यांचीही हरकत असू शकते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्याने विमानतळ पोलिस नियंत्रण कक्षाच्या 112 नंबरवर कॉल करुन विमानतळ उडवून देण्याची धमकी दिली होती. ‘बॉम्बस्फोट होईल’, असे त्याने कॉलमध्ये म्हटले होते. त्यानंतर लगेच कॉल डिस्कनेक्ट झाला होता. कॉलनंतर पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने संपूर्ण विमानतळाची पाहणी केली होती. बॉम्बशोधक आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते की, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्व टर्मिनल्स आणि पॉइंट्सवर कडक तपासणी केली जात आहे. सीआयएसएफ आणि पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण विमानतळाची कसून तपासणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com