
Bomb threat to 13 schools shakes Bangalore; Students, staff were evacuated from the premises:
बंगळुरूमधील किमान 13 शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही धमकी या शाळांना ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे.
बसवेश्वरनगरमधील नेपाळ आणि विद्याशिल्पा आणि येलाहंका परिसरात असलेल्या इतर खासगी शाळांसह सात शाळांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत.
पोलिसांनी तात्काळ परिस्थितीला प्रतिसाद दिला, सावधगिरीचा उपाय म्हणून धमक्या मिळालेल्या शाळांमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि तपास सुरू केला.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या एका प्ले स्कूललाही बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता.
सध्या पोलीस सर्व शाळांचा शोध घेत आहेत, अद्याप त्यांना काहीही सापडले नाही. हा फेक कॉल असल्याचे दिसत असून, पोलिसांकडून शोध सुरू आहे.
गेल्या वर्षी देखील, बंगळुरूमधील अनेक शाळांना अशाच ईमेल धमक्या आल्या होत्या, परंतु त्या सर्व अफवा ठरल्या.
शाळेतील कर्मचाऱ्यांनी सकाळी त्यांचा मेल तपासण्यासाठी त्यांचे ईमेल खाते उघडले तेव्हा ही धमकी समोर आली.
बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद यांनी सांगितले की, बॉम्ब निकामी करणारे पथक शाळेच्या परिसराची चौकशी करत आहे.
बॉम्बची धमकी मिळालेल्या शाळांपैकी एका शाळेने पालकांना संदेश दिला की, सुरक्षेच्या कारणास्तव मुलांना घरी परत पाठवले जात आहे. चिंताग्रस्त पालक आपल्या मुलांना सुखरूप घरी आणण्यासाठी शाळेच्या बाहेर वाट पाहत होते.
यापूर्वी 19 जुलै 2022 रोजी बेंगळुरूमधील 30 शाळांना अशीच धमकी देण्यात आली होती. 8 एप्रिल 2022 रोजी 6 शाळांना धमकीचा संदेशही पाठवण्यात आला होता. या सर्व धमक्या खोट्या निघाल्या. गेल्या नोव्हेंबरमध्ये बेंगळुरूच्या होसुर रोडवर असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या कार्यालयाला बॉम्बची धमकी मिळाली होती. नोकरीवरून काढून टाकलेल्या माजी कर्मचाऱ्याने रागाच्या भरात ही धमकी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
अशाच एका प्रकरणात 20 मे 2022 रोजी एका अनोळखी व्यक्तीने फोन करून बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट (Bomb Blast) घडवून आणण्याची धमकी दिली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.