Delhi To Mumbai Flight: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या प्लाइटमध्ये बॉम्ब, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लॅंडिंग; प्रवाशांमध्ये घबराट

Delhi To Mumbai Flight: प्लाइटमध्ये बॉम्ब सापडण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा प्लाइटमध्ये बॉम्ब सापडल्याने उड्डाणे वळवण्यात आली आहेत.
Delhi To Mumbai Flight
Delhi To Mumbai FlightDainik Gomantak

Delhi To Mumbai Flight: प्लाइटमध्ये बॉम्ब सापडण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा प्लाइटमध्ये बॉम्ब सापडल्याने उड्डाणे वळवण्यात आली आहेत. बॉम्बच्या धमकीमुळे दिल्लीहून मुंबईला येणारे विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले.

प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता अहमदाबादमध्ये प्लाइटचे आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना फ्लाइटमधून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

फ्लाइट चेकिंग करण्यात येत आहे. हे प्लाइट आकासा एअरलाईन्सचे असून, या प्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सध्या तपास सुरु आहे.

फ्लाइटमध्ये 186 प्रवासी होते

दरम्यान, फ्लाइटमध्ये बॉम्ब सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर आता आकासा एअरलाइन्सकडूनही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. आकासा एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, आकासा एअरच्या प्रवक्त्याला जबाबदार धरण्यात आले आहे. 3 जून 2024 रोजी दिल्लीहून मुंबईला (Mumbai) उड्डाण करणारे Akasa एअर फ्लाइट QP 1719 ला सुरक्षा चेतावणी मिळाली होती. या फ्लाइटमध्ये 186 प्रवासी होते, ज्यात 1 बालक आणि 6 क्रू मेंबर्स होते.

Delhi To Mumbai Flight
Delhi Goa Flight: दिल्ली-गोवा फ्लाइटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; राजस्थानच्या प्रवाशाविरोधात गुन्हा

प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले

सुरक्षेचा इशारा मिळाल्यानंतर निर्धारित सुरक्षा आणि सुरक्षा प्रक्रियेनुसार प्लाइट अहमदाबादच्या दिशेने वळवण्यात आले. फ्लाइट कॅप्टनने सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियांचे पालन केले. दिल्लीहून मुंबईला (Mumbai) येणारे विमान सकाळी 10.13 वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरले.

येथे उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना प्लाइटमधून सुखरुप बाहेर काढण्यात आले. प्लाइटची तपासणी केली जात आहे. Akasa Air सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे आणि सहकार्यही करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com