Sunny Leone: सनी लिओनच्या फॅशन शोजवळच झाला स्फोट, चीनी बॉम्ब असल्याची शक्यता

शनिवारी सकाळी 6.30 वाजता हा स्फोट झाला.
Sunny Leone
Sunny LeoneDainik Gomantak
Published on
Updated on

प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओन सहभागी होणार असलेल्या फॅशन शोच्या ठिकाणाजवळ मोठा स्फोट झाला आहे. मणिपूरमधील इंफाळमध्ये ही घटना घडली आहे.

मणिपूरच्या हट्टा कांगजीबुंग भागात हा स्फोट झाला असून, सनीच्या कार्यक्रमस्थळापासून हा परिसर केवळ 100 मीटर अंतरावर आहे. शनिवारी सकाळी 6.30 वाजता हा स्फोट झाला. दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Sunny Leone
Tejashwi Yadav: गोवा नव्हे बिहारमध्ये येतात सर्वाधिक पर्यटक! उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट स्फोटक यंत्राने की ग्रेनेडने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. जिथे स्फोट झाला तिथून हाकेच्या अंतरावर सनीच्या शोसाठी स्टेज उभारला जात होता.

पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत घटनेची माहिती घेतली. पोलिस कमांडोंच्या पथकाने जवळपासच्या ठिकाणी शोधमोहीम राबवली असून, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. बॉम्ब हल्ल्याचा उद्देश शोधण्यासाठी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sunny Leone
Mahadayi Water Dispute: मंत्री नाईक माहित नाही पण सार्दिन लोकसभेत म्हादईचा मुद्दा मांडणार - गोवा काँग्रेस

सनी लिओन रविवारी फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून सहभागी होणार होती. ती मणिपूरमध्ये खादी आणि हातमागाचा प्रचार करणार होती. 'ब्राइडल कॉउचर फेस्टिव्ह सीझन फॉल विंटर कलेक्शन 2023' अशी या शोची टॅगलाइन होती. सनी लिओनीच्या सहभागामुळे त्याची बरीच चर्चा झाली आणि शोची बरीच तिकिटेही विकली गेली आहेत.

चीनी बॉम्ब असल्याची व्यक्त केली जात आहे शक्यता

दरम्यान, हा बॉम्ब चीनी बॉम्ब असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, हे ग्रेनेड देखील असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिस कसून तपास करीत आहेत. स्फोटाबाबत ठोस काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com