एकेकाळी शूटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कारमध्ये...

चित्रपटांच्या शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या जुन्या अॅम्बेसेडर कारमध्ये एक मृतदेह आढळून आला असल्याचे समोर आले आहे.
Ambassador Car
Ambassador CarDainik Gomantak
Published on
Updated on

चित्रपटांच्या शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या जुन्या अॅम्बेसेडर कारमध्ये ( Ambassador car) एक मृतदेह आढळून आला असल्याचे समोर आले आहे. बेंगळुरूमधील राजाजीनगर येथे दोन वर्षांहून अधिक काळ निर्जन रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधून पोलिसांनी शुक्रवारी मृतदेह बाहेर काढला आहे. या रंगीबेरंगी कारसोबत लोकांनी अनेकदा फोटो देखील काढले आहेत. एक काळ असा होता की चित्रपटाच्या शूटिंगसाठी अॅम्बेसेडर कार वापरली जात होती. सजवलेली कार पाहून त्यात कुणाचा मृतदेह असू शकतो याचा अंदाजही लावणे कठीण जात होते. (The body was found in the car that was once used for filming)

Ambassador Car
Tripura New CM: माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

मिळालेल्या माहितीनुसार, या कारमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांना स्थानिकांकडून मिळाली होती. यानंतर पोलीस गाडीची तपासणी करण्यासाठी तिथे आले. दरम्यान, अज्ञात व्यक्तीचा मृतदेह त्यांना तिथे सापडला. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास कारच्या पुढील सीटवरून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पोलिसांना कारमधील मृतदेहाजवळून काही दारूचे टेट्रा पॅक देखील सापडले. तथापि, त्या व्यक्तीने आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष केला होता किंवा त्याला ठार मारण्याआधी जबरदस्ती करण्यात आली होती, असे कोणतेही संकेत त्या जागेवरून मिळालेले नाहीत.

कारचे दरवाजे कधीही लॉक केले नाहीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार गोपी नावाच्या व्यक्तीची असून, त्यांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. चित्रपटांच्या शूटिंगसाठी आवश्यक वस्तू पुरवण्याचे काम गोपी करत होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही कार निर्जन रस्त्याच्या कडेला पडून होती. सहसा लोक येताना-जाताना समोरून त्यागाडीसोबत फोटो काढायचे. या सजवलेल्या कारचा वापर चित्रपटांच्या शूटिंगसाठी केला जात असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. तर शूटिंगसाठीच या कारला कलरफुल लूक देण्यात आला होता. त्यावर अनेक प्रकारची रचनाही केली गेली होती. विशेष म्हणजे या कारचे दरवाजे कधीही बंद झाले नाहीत.

Ambassador Car
आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात सीबीआयने तिघांना ठोकल्या बेड्या

मृतदेहाची ओळख पटली नाही

पोलिसांनी मृताच्या खिशातून आधारकार्ड जप्त केल्यानंतरही त्याची ओळख पटू शकलेली नाही. कारण ते आधारकार्ड कामाक्षीपल्य येथील 64 वर्षीय व्यक्तीचे होते. तर कारमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचे अंदाजे वय 35 वर्षे आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये देखील पाठवला आहे जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीचा मृत्यू अति मद्यपान केल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी गाडीच्या मालकाचीही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. कारण मयत आणि कार मालक यांच्यात काहीतरी संबंध असावेत असा संशय आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास अध्याप सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com