भाजपने 8 मुद्द्यांवर उत्तर प्रदेशात मिळवली सलग दुसऱ्यांदा सत्ता

युपीवासी संतापले होते पण योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेवर त्यांचा राग नव्हता
UP Election Result 2022 updates | UP BJP election News
UP Election Result 2022 updates | UP BJP election News Dainik Gomantak

महागाई, बेरोजगारी, भटकी जनावरे हे तीन प्रमुख मुद्दे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2022) कव्हरेजमध्ये होते, ज्यावरून जनता योगी सरकारवर नाराज होती. यावर योगी सरकार वारंवार स्पष्टीकरण देत असले तरी जनता या मुद्द्यांवर उघडपणे बोलत होती. महिला, तरुण, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्गाने सरकारची काही चांगली कामे बघीतली. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या प्रतिमेबद्दल लोकांमध्ये नाराजी नाही, हा भाजपचा एक प्लस पॉइंट होता. या मुद्द्यांवर लोक संतापले होते पण योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेवर विशेष राग नव्हता. या निवडणुकीत भाजपच्या चमत्कारिक विजयामागे कोणते मुद्दे होते ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. (UP Election Result 2022 news updates)

दहशतवाद

या निवडणुकांमध्ये दहशतवादाचा मुद्दाही तापला. अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी झालेल्या 38 दोषींपैकी एकाचे कुटुंब सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप भाजपने केला आहे. नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजपचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लखनऊ, रामपूरसह अनेक जिल्ह्यांतील बॉम्बस्फोटातील आरोपींना सपाने पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या मोहम्मद सैफचा संदर्भ देत, सैफचे वडील शादाब अहमद आणि सपा प्रमुख अखिलेश यादव एका फोटोमध्ये एकत्र उभे असल्याचे दिसत आहे, असे ठाकूर म्हणाले होते.

भटक्या जनावरांचा मुद्दा

यावेळी भटक्या जनावरांचा मुद्दा चर्चेत राहिला. शेतकऱ्यांची मोठी अडचण असलेला हा मुद्दा प्रचारादरम्यान चर्चेच होता. ज्याकडे सरकार सुरुवातीपासूनच दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले.निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा हा प्रश्न ऐरणीवर आला. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. खरं तर, गेल्या काही वर्षांपासून यूपीमध्ये भटक्या प्राण्यांची समस्या पाहायला मिळत आहे. गावातील भटक्या जनावरांनी शेतातील पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. भटक्या जनावरांपासून आपली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागे राहावे लागत होते. त्याचबरोबर भटक्या जनावरांमुळे अनेक रस्ते अपघातही युपीमध्ये झाले आहेत.

मोफत रेशन

भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान हा मुद्दा उचलून धरला होता. विशेषतः पूर्वांचलच्या दिशेने हा मुद्दा चर्चेत होता. हा मुद्दा या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा करून देणारा होता. कोरोनाच्या काळात गरिबांना मोफत रेशन वाटपाचे काम भाजपने केले आणि हे रेशन महिन्यातून दोनदा दिले गेले. नंतर तेल, मीठ वाटण्याचे कामही झाले. अनेकवेळा पीएम मोदी मोफत रेशन वितरणाच्या मुद्द्यावर बोलतानाही दिसले.

बुलडोझर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुका सुरू होताच विकासाच्या वाटेवर येणाऱ्यांवर बुलडोझर चालवल्याच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. मात्र भाजपसोबतच योगी आदित्यनाथही आपल्या बुलडोझरच्या कारवाईला सार्थ ठरवत जनतेचा पाठिंबा मिळविण्यावर ठाम राहिले. परिस्थिती अशी आली की, मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक सभांमध्ये उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या वतीने स्टेजला लागूनच बुलडोझर उभे केले जाऊ लागले. हे दृश्य पाहून मुख्यमंत्र्यांना खूप आनंद व्हायचा.

UP Election Result 2022 updates | UP BJP election News
ढवळीकरांचा 24 तासात यु-टर्न; ममतांना धक्का देत भाजपसोबत सत्तेत सहभागी

घराणेशाही

निवडणुकीदरम्यान घराणेशाहीचा मुद्दाही तापला. भाजपवर हल्लाबोल करताना सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी आरोप केला की, भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मुद्द्यावर वक्तव्य करायला चुकले नाहीत. 28 फेब्रुवारी रोजी महाराजगंज येथील निवडणूक सभेत सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, या कुटुंबियांना कुठेतरी जायचे असेल तर त्यांच्याकडे मोठी वाहने आहेत. जे घराणेशाहिचे राजकारण करतात ते यूपीला मजबूत बनवू शकत नाहीत, असे मोदी म्हणाले होते.

महिला सुरक्षा

भाजपप्रती महिलांच्या संवेदना वाढल्या आहेत. गावोगावी लोकांनी दिलेल्या मतानुसार ही माहिती पुढे आली आहे. या सरकारमध्ये महिलांना भीती वाटत नसल्याचे महिलांनी सांगितले. गावातील दबंग लोक आता आमचा छळ करतील अशी भीती ग्रामीण भागातील महिलांनी व्यक्त केली होती. मात्र आता या सरकारने गुंडांना आळा घातला असल्याचे महिलांनी सांगितले. 2017 पूर्वी विशिष्ट जातीचे लोक आम्हाला धमकावत होते, आमच्या जमिनी सुद्धा ताब्यात घेत होते. त्यांची तक्रार करण्यासाठी आम्ही पोलिस ठाण्यात जायचो तेव्हा तिथेही आमचे ऐकले जात नव्हते, अशी व्यथा युपीच्या महिलांनी मांडली होती.

कायदा आणि सुव्यवस्था

योगी सरकारने गुंडा राजचा मुद्दा प्रचारादरम्यान जोरदारपणे मांडला होता. 2017 पूर्वी राज्यात अनेक छोट्या-मोठ्या दंगली झाल्या. योगी सरकारने हा प्रमुख मुद्दा बनवला होता आणि निवडणुकीच्या कव्हरेजमध्येही हा मुद्दा दाखवण्यात आला होता. सपा सरकारमध्ये गुंडराज शिगेला पोहोचला होता, असा सर्वसामान्यांचा समज होता. युपीतील लोकांना जगणे कठीण झाले होते. मात्र योगी सरकारच्या कोणत्याही विभागाला दादागिरी करण्याची परवानगी नव्हती. अनेक बडे माफिया तुरुंगात बंद करण्यात आले आहेत. जवळपास सर्वत्र लोकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कौतुक केले. आणि म्हणून युपीमध्ये भाजपसाठी हा प्लस पॉइंट ठरला आहे.

UP Election Result 2022 updates | UP BJP election News
बाबूशची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून मनधरणी

महामार्ग आणि लिंक रोड

भाजपच्या विजयाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे युपीमधीलम हामार्ग आणि लिंक रोड. या सरकारमध्ये द्रुतगती मार्ग, महामार्ग आणि लिंक रोडवर बरीच कामे झाली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात द्रुतगती मार्ग आणि रस्त्यांची बरीच कामे केली आहेत. या सरकारने गावोगावचे रस्ते दुरुस्त केले आहेत. या कारणामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले.

अयोध्येत राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, कुशीनगर विमानतळ, पूर्वांचल एक्सप्रेस वे राम मंदिर सुरू झाले आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर येथेही भव्य दिवाळी साजरी करण्यात आली. संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष वेधून घेणारे हे काही मुद्दे यपीत भाजपसाठा प्लस पॉइंट ठरले. अयोध्येचे राम मंदिर, बनारस काशी विश्वनाथ कॉरिडॉर, कुशीनगर विमानतळ आणि पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर जोरदार चर्चा रंगली. ही अशी काही कामे होती ज्यांचा उल्लेख केवळ जिल्ह्यात किंवा राज्यातच नाही तर संपूर्ण देशात झाला आहे. लोकांनीही हे मुद्दे लक्षात घेऊन मतदान केले आहे. परिणामी युपीमध्ये भाजपने मुसंडी मारली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com