Lok Sabha Elections 2024: ''भाजप 400 जागाही जिंकू शकतो...'', लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला EVM ची भीती

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीला अजून 4 महिने बाकी असून भाजपने आतापासूनच जोरदार तयारी केली आहे.
Prime Minister Narendra Modi and Amit Shah
Prime Minister Narendra Modi and Amit ShahDainik Gomantak

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीला अजून 4 महिने बाकी असून भाजपने आतापासूनच जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे मात्र, तयारी करण्याऐवजी काँग्रेस आधीच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यात व्यस्त आहे. ईव्हीएममधील त्रुटी दूर न केल्यास भाजप 400 हून अधिक जागा जिंकू शकेल, असे पक्षाचे नेते सॅम पित्रोदा यांनी गुरुवारी म्हटले. त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'ही निवडणूक भारताचे भवितव्य ठरवणार आहे.' दरम्यान, निवडणूक आयोग सातत्याने असे आरोप फेटाळून लावत आहे. तरीही काही विरोधी पक्ष नेते अनेकदा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

दरम्यान, काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही ईव्हीएमद्वारे 100 टक्के मतांसाठी VVPAT ची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. एवढेच नाही तर या VVPAT स्लिप बॉक्समध्ये न ठेवता त्या मतदारांना द्याव्यात. राम मंदिराबाबत जे काही बोलले होते त्याचाही विपर्यास करण्यात आल्याचे सॅम पित्रोदा यांनी मुलाखतीत सांगितले. धर्म ही वैयक्तिक बाब असून त्याची राजकारणात सरमिसळ करु नये, असे ते म्हणाले. संपूर्ण देशात फक्त राम मंदिराचीच चर्चा होत असल्याने त्यांना वाईट वाटत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

Prime Minister Narendra Modi and Amit Shah
Lok Sabha Election 2024: नमो का रागा? देशात आता निवडणुका झाल्यास कोणाचं सरकार येईल? वाचा काय सांगतो ओपिनियन पोल

राहुल गांधींच्या मणिपूर ते मुंबई या भारत न्याय यात्रेबाबत ते म्हणाले की, ती खूप महत्त्वाची आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचा देश बनवायचा आहे हे आपण ठरवायचे आहे. 2024 च्या निवडणुका भारताचे भवितव्य ठरवणार आहेत. सॅम पित्रोदा पुढे म्हणाले की, 'सर्व संस्था स्वायत्तपणे चालवायला हव्यात. एका धर्माच्या लोकांचे वर्चस्व असलेले राष्ट्र हवे आहे'? ईव्हीएमबाबत चिंता व्यक्त करताना पित्रोदा म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या मुख्य शिफारशींपैकी एक म्हणजे मतदारांना व्हीव्हीपीएटी स्लिप देण्यात याव्यात.'

माजी न्यायमूर्तींचा अहवाल लागू करण्याची मागणी केली

यामुळे लोकांनी ज्या व्यक्तीसाठी मतदान केले आहे, त्याला ते मिळाले आहे की नाही याची खात्री करता येईल. याबाबत निवडणूक आयोग कधी कार्यवाही करेल याची मी वाट पाहत होतो, मात्र तसे झाले नाही, तेव्हा मला बोलावे लागल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले होते की, येथे मुद्दा हा नाही की 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत आणि आता लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत. ही विश्वासार्ह बाब असून निवडणूक आयोगाला जागे करावे लागेल. ते पुढे म्हणाले होते की, आज लोकशाहीचे रुपांतर वन मॅन शोमध्ये झाले आहे.

Prime Minister Narendra Modi and Amit Shah
Lok Sabha Elections: 2024 मध्ये महिला ठरणार भाजपसाठी गेम चेंजर? मोदी सरकारचा फोकस...

'ईव्हीएम दुरुस्त न झाल्यास भाजपचा 400 चा दावा बरोबर'

दरम्यान, 400 जागा जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यावर सॅम पित्रोदा म्हणाले की, 'त्यांना असे वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा. हे देशाने ठरवायचे आहे. पण सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ईव्हीएमच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. ईव्हीएम दुरुस्त न झाल्यास 400 चा मुद्दा खरा ठरु शकतो. ही समस्या दूर झाली तर असे दावे चुकीचे सिद्ध होतील. राम मंदिराच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. मला एवढेच म्हणायचे होते की धर्म ही वैयक्तिक बाब आहे. हे जनतेवर सोडले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com