नेपाळच्या प्रसिद्ध पबमध्ये दिसले राहुल गांधी, भाजपने केला व्हिडिओ व्हायरल

राहुल गांधींची मैत्रीण कोण? जिच्या लग्नासाठी काँग्रेस नेते नेपाळला
bjp shares a video of rahul gandhi partying in nepal kathmandu pub
bjp shares a video of rahul gandhi partying in nepal kathmandu pub Dainik Gomantak

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या नेपाळच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या नेपाळ दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडूमधील नाईट क्लबमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. हा व्हिडिओ नेपाळच्या लॉर्ड ऑफ द ड्रिंक्सचा असल्याचे सांगण्यात येत आहे. (Rahul Gandhi in party)

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधी काय करत आहेत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. मात्र राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसाचार होत असताना राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. तर त्यांनी भारतातील लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.

bjp shares a video of rahul gandhi partying in nepal kathmandu pub
राणा दाम्पत्यावर नवीन संकट, बेकायदा बांधकामाची बीएमसी करणार चौकशी

पूनावाला पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष संपलाय, राहुल गांधी राजकारणात गंभीर नाहीत. जेव्हा त्यांच्या पक्षाला आणि देशातील जनतेला त्यांची गरज असते, तेव्हा ते नेपाळमध्ये पार्टी करत आहेत.

कपिल मिश्रा यांनी निशाणा साधला

दुसरीकडे भाजपचे आणखी एक नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, हा राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय आहे. राहुल गांधी कोणासोबत आहेत, असा सवाल त्यांनी केला. चीनचे एजंट आहेत का? राहुल गांधींनी लष्कराविरोधात जे ट्विट केले ते चीनच्या दबावाखाली आहे का? हा प्रश्न राहुल गांधींचा नसून देशाचा आहे.

भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट केले की, मुंबईवर हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते. आता त्यांचा पक्ष अडचणीत आला असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com